वॉर्डाचा कानोसा-२

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:59+5:302015-02-13T23:10:59+5:30

बजाजनगर येथील अंतर्गत रस्त्यांची वाताहत

Warda's Kanoosa-2 | वॉर्डाचा कानोसा-२

वॉर्डाचा कानोसा-२

ाजनगर येथील अंतर्गत रस्त्यांची वाताहत

बजाजनगर :
बजाजनगर येथे जानेवारी महिन्यात २४ तास पाणी सेवा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक गल्लीत खोदकाम करण्यात आले. परंतु ते रस्ते अजूनही व्यवस्थित करण्यात आले नाही. रस्त्यांची वाताहत झाली असून वाहनचालक व सामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी बजाजनगर येथील नागरिकांनी केली आहे.

पांढराबोडी रस्त्यावरील पाण्याचा फव्वारा अतिक्रमणात दडपला
पांढराबोडी :

रामनगर चौकाकडून पांढराबोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कबाड्यांची दुकाने आहेत. या कबाड्यांनी संपूर्ण रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवले आहे. रस्त्यांवरच त्यांचे सामान पडून असते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना मोठा त्रास होतो. तसेच रामनगर चौकात पांढराबोडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच महापालिकेने सौंदर्यीकरण अंतर्गत पाण्याचा फवारा निर्माण केला होता. परंतु हा फवारासुद्धा अतिक्रमणात दडपला आहे. महापलिकेने याकडे लक्ष दिल्यास व अतिक्रमण हटविल्यास सुंदर असा फवारा पुन्हा मुक्त होऊ शकेल आणि नागरिकांनाही दिलासा मिळेल.

Web Title: Warda's Kanoosa-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.