वॉर्डाचा कानोसा -१
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:13+5:302015-02-13T23:11:13+5:30

वॉर्डाचा कानोसा -१
> फोटो आहे... वॉर्डाचा कानोसा..--------------पिवळी नदी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात कारखान्यामुळे प्रदूषण वाढले : २० वसाहतींना धुराचा फटका गरीबनवाजनगर : आशीनगर झोन अंतर्गत येत असलेल्या गरीबनवाजनगर प्रभागांतर्गत येणाऱ्या पिवळीनदी परिसरातील कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. तब्बल २० वसाहतींना या धुराचा फटका बसत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिवळी नदी परिसरात ३० पेक्षा अधिक कंपन्या आहेत. यातील काही कंपन्यांचा धूर सोडणाऱ्या चिमण्या या खूप कमी उंचीवर आहे. त्यामुळे परिसरातील २० ते २२ वसाहतींना या धुराचा फटका बसतो आहे. या धुरामुळे धम्मानंदनगर, भीमवाडी, बम्लेश्वरीनगर, एकता नगर, पिवळी नदी, उप्पलवाडी, रमाईनगर, अरविंदनगर, संघर्षनगर, हामीदनगर, संगमनगर, वांजरा परिसर, पवननगर, यशोधरानगर या वस्तीतील नागरिक त्रस्त आहेत. साधारणत: २० ते २५ हजार नागरिकांना या प्रदूषणाचा त्रास होत आहे. पिवळी नदीला लागून हे कारखाने आहेत. तर दुसऱ्या बाजुला वस्त्या आहेत. या परिसरात वीटभट्ट्याचे कारखाने, कोल डेपो, प्लास्टर ऑफ पॅरिस, सिमेंट वर्क रंग तयार करणे, इस्पातसारखे मोठे कारखाने आहेत. काही कंपन्यांमध्ये धूर बाहेर फेकणाऱ्या चिमण्या आहेत. चिमण्या या किमान १०० फूट उंचीवर असायला हव्या, परंतु काही कारखान्यामधील चिमण्या या कमी उंचीच्या आहेत. या कारखान्यामुळेच पिवळी नदी संपूर्णपणे प्रदूषित झाली आहे. आता विहीर आणि बोअरवेलचे पाणीसुद्धा प्रदूषित होऊ लागले आहे. परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. तेव्हा याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. बॉक्स... शारदा चौक ते कळमना पुलापर्यंतचे पथदिवे बंदकळमना : शारदा कंपनी चौक ते कळमना पूल रिंगरोडपर्यंतचे पथदिवे बंद पडले आहेत. रात्री सर्वत्र अंधार असतो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक चालत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. दुचाकी आणि पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.