प्रभाग समिती सभापती निवडणूक २१ रोजी आदेश प्राप्त : एकीमुळे निवडणूक सोपी
By Admin | Updated: March 15, 2016 00:32 IST2016-03-15T00:32:03+5:302016-03-15T00:32:03+5:30
जळगाव : मनपाच्या प्रभाग समिती सभापतींची निवडणूक २१ मार्च रोजी घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांकडून मनपाला १४ रोजी सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहतील.

प्रभाग समिती सभापती निवडणूक २१ रोजी आदेश प्राप्त : एकीमुळे निवडणूक सोपी
ज गाव : मनपाच्या प्रभाग समिती सभापतींची निवडणूक २१ मार्च रोजी घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांकडून मनपाला १४ रोजी सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहतील. मनपाच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड ९ मार्च रोजी झाली होती. ही निवड एक वर्षभरासाठी असल्याने मार्चअखेरही मुदत संपत आहे. तत्पूर्वी नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे. त्यासाठी नगरसचिव विभागामार्फत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी २१ मार्च रोजी ही निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम मात्र जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीने निित केला जाणार आहे. गत निवडणूक चुरशीची झाली होती. त्यात प्रभाग समिती क्र.१च्या सभापतीपदी अजय पाटील, समिती २च्या सभापतीपती कंचन सनकत, समिती क्र.३वर सुनील पाटील तर समिती क्र.४ वर नितीन नन्नवरे यांची निवड झाली होती. त्यात राष्ट्रवादीत फूट पडली होती. मात्र आता खाविआ, मनसे, जनक्रांती, शिवसेना सोबत असल्याने व त्यात राष्ट्रवादीही सोबत असल्याने निवडणूक सामंजस्याने पार पडण्याची शक्यता आहे.