प्रभाग-६ -जरीपटका -२
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:35+5:302015-01-29T23:17:35+5:30
बॉक्स..

प्रभाग-६ -जरीपटका -२
ब क्स.. अरुंद गल्ल्या, पथदिवे नाही जुना जरीपटका माता मंदिर आणि राष्ट्रीय झेंडा परिसरात रस्त्याच्या नावावर केवळ अरुंद गल्ल्या आहेत. पथदिवे जवळपास नाहीच. एक दोन पथदिवे मुख्य रस्त्याच्या बाजूला लावले आहेत. मात्र ते बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी विशेषत: महिलंना त्रास होतो. बॉक्स..साफसफाईची बोंब जरीपटका प्रभागात जरीपटका मुख्य बाजारपेठेचा भाग असो की, जुना जरीपटका, दयालू सोसायटी असो की, बँक कॉलनी सर्वत्रच साफसफाईची बोंंब आहे. जरीपटक्यातील मुख्य बाजारात तर कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. त्यावरच जनावरांचा मुक्त संचार असतो. जुना जरीपटका भागात तर साफसफाई करणारे फिरकतच नाहीत. त्यामुळे सर्वत्रच अस्वच्छतेचे वातावरण असते. बॉक्स.. अतिक्रमणाचा विळखा जरीपटका प्रभागातील मुख्य बाजार परिसर हा विकसित भाग समजला जातो. येथील नागरिकांचा व्यापार व राहणे दोन्ही एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे बहुतांश व्यापारी वर्गाचा हा भाग असून येथील नागरिक अतिक्रमणामुळे त्रस्त झाले आहे. मोठमोठ्या इमारतींनी रस्त्यावरच अतिक्रमण करून ठेवले आहेत. खासगी सामान रस्त्यावरच ठेवण्यात आले आहेत. एखाद्या गरीबांचे साधे अतिक्रमण असेल तर ते लगेच तोडले जाते परंतु श्रीमतांचे अतिक्रमण कोण तोडणार, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यांना गल्लीचे स्वरूप आले असून गल्ल्या जवळपास नष्ट झाल्या आहेत. जरीपटका चौधरी चौक परिसरातील दोन मोकळे मैदान सुद्धा अतिक्रमणाने गिळंकृत केली आहेत. बॉक्स.. नळ आहेत तरी पाण्याची टंचाई जुना जरीपटका भागात नळ आहेत. परंतु अतिशय खोलवर नळाची पाईपलाईन आहे. त्यामुळे महिलांना पाणी भरायला खूप त्रास होतो. दाबाने पाणी येत नाही. माता मंदिर परिसरात सार्वजनिक नळ आहेत. मात्र नळ येण्याची कुठलीही वेळ निश्चित नाही. त्यामुळे नळ असूनही पाण्याची टंचाई कायम आहे. बॉक्स.. बोअरवेल-टँकरचा आधार जरीपटका मुख्य बाजार परिसरात नळाची लाईन आलेली आहे. मात्र त्याला पाणीच नाही. प्रत्येक घरात बोअरवेल आहे. त्यामुळे या बोअरवेलचाच येथील नागरिकांना आधार आहे. नळाला पाणी नसल्याने आणि काहींच्या घरी बोअरवेल नसलेल्यांना टँकरची प्रतीक्षा करावी लागते. दर दोन दिवसांनी टँकर येतो. त्यामुळे बोअरवेल आणि टँकरच्या भरवशावर येथील नागरिकांना राहावे लागत आहे.