यरंडोळ येथे वारकरी महामेळावा उत्साहात

By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:52+5:302014-05-09T18:10:52+5:30

Warakari Mahmelova enthusiasm at Yerundol | यरंडोळ येथे वारकरी महामेळावा उत्साहात

यरंडोळ येथे वारकरी महामेळावा उत्साहात

>आजरा :
एरंडोळ (ता. आजरा) येथील ज्ञानेश्वरी माऊली गुरुकुल आश्रमाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त वारकरी महामेळावा उत्साहात पार पडला.
शंकर पठेकर या दांम्पत्याच्याहस्ते उपस्थितीत साधू-संतांची पाद्यपूजा करण्यात आली. आजरा-गडहिंग्लज, चंदगड, गारगोटी राधानगरीसह महाराष्ट्रातील व कर्नाटकातील प्रमुख कीर्तनकार, प्रवचनकार व विणेकरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे मनोज खाडे म्हणाले, धर्म रक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. संत मंडळींनी धर्म रक्षणासाठी जनजागृती करावी. देवालयांच्या आर्थिक उत्पन्नावर डोळा ठेवून राज्यकर्ते देवालये ताब्यात घेण्याचा राज्यकर्ते डाव मांडत आहेत तो हाणून पाडला पाहिजे. सध्या चाललेले इतिहासाचे विकृतीकरण थांबवले पाहिजे.
तुकाराम काळे म्हणाले, व्यसनमुक्ती व समाज जागृतीचे काम वारकरी करतात. आपल्या संप्रदायाच्या विकासासाठी वारकर्‍यांनी संघटीत व्हावे. यावेळी पांडुरंग काजवे मठाधिश तुळशीराम पोरवरकर यांनीही मार्गदर्शन केले. सायंकाळी तुकाराम काळे यांचे कीर्तन व हरिपाठ झाला.
यावेळी संदीप कोंडकर, नामदेव सुतार, आनंदराव घोरपडे, मधुकर क्रमित, अरूण देसाई, महेश भादवणकर उपस्थित होते. भाविकांनी महामेळाव्यास प्रचंड गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Warakari Mahmelova enthusiasm at Yerundol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.