शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मोदींच्या एका शब्दावर युद्ध थांबवलेले, आज पुन्हा मदतीला धावला; भारताच्या खऱ्या मित्रांपैकी एक...सौदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 23:58 IST

गोष्ट २०१५ ची आहे. सौदी अरेबियाने येमेनविरोधात युद्ध छेडले होते. तेव्हा येमेनमधून भारताने 5600 लोकांना बाहेर काढले होते.

सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये हजारो भारतीय नागरीक अडकले आहेत. यापैकी काही भारतीयांवा घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान भारतात दाखल झाले आहे. भारतीय नौदलाने सुदानमध्ये ७२ तासांच्या सीझफायरमध्ये आपल्या युद्धनौका पाठविल्या आहेत. भारतीय नागरिकांना य़ा युद्धनौकांमधून जेद्दाहला आणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका शब्दावर युद्ध थांबवणारा, अवघ्या जगाला आपल्या तालावर नाचवू शकणारा देश सौदी आज पुन्हा एकदा भारतीयांच्या मदतीला धावून आला आहे. 

गोष्ट २०१५ ची आहे. सौदी अरेबियाने येमेनविरोधात युद्ध छेडले होते. तेव्हा येमेनमधून भारताने 5600 लोकांना बाहेर काढले होते. यात 4640 भारतीय तर अन्य लोक हे ४१ देशांचे होते. येमेनमधील परिस्थिती भीषण होती. भारत सरकारने सौदीच्या राजाकडे एक शब्द टाकला, आम्हाला आमच्या लोकांना बाहेर काढुदे...तेव्हा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेले तेव्हा कसे मोदींच्या शब्दाखातर सौदीने युद्ध थांबविले होते. 

येमेनच्या आकाशातून बॉम्बवर्षाव होत होता आणि साडे चार हजार भारतीयांचा जीव धोक्यात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परराष्ट्र दौरे केले त्यावर टीका केली जाते, परंतू त्यातून काय मिळविले, असा सवाल सुषमा यांनी केला होता. समुद्रात लुटारू टपून बसलेले होते, आकाशातून बॉम्बचा पाऊस पडत होता. तिन्ही रस्ते बंद होते. अशावेळी मोदींनी ऑस्ट्रेलियात सौदीच्या राजांपैकी एक सुलमान बिन अब्‍दुल अजीज यांच्याशी चर्चा केल्याचे मला आठवले होते. मी लगेचच मोदींकडे गेले आणि त्यांना फोन लावायला सांगितला. सौदीच्या राजासोबत त्यांची चांगली मैत्री होती. फक्त सात दिवसांसाठी युद्धा थांबवा, असे सांगण्यास सांगितले. मोदींनी लगेचच सौदीच्या राजाला फोन केला आणि सात दिवसांत भारतीयांना बाहेर काढण्याचा मनसुबा सांगितला. 

सौदीच्या सुल्तानाने या प्रस्तावावर मोदींकडे एका तासाची वेळ मागितली. युद्ध थांबवायचे म्हणजे सौदीसाठी मोठा धोका होता. दुष्मन या काळात त्याची ताकद वाढविण्याची तयारी करू शकत होता. बरोबर एक तास होत नाही तोच सौदीच्या राजाने फोन केला. त्याने सात दिवस नाही परंतू रोज दोन तास आम्ही युद्ध थांबवू, हे पुढील एक आठवडा करू, असे सांगितले. 

मोदींनी सुषमांना दोन तासांत आपल्याला सर्व तयारी करायची असल्याचे सांगितले. भारतीयांना दोन तासासाठी विमानतळाचे रस्ते खोलण्याचे सौदीने आदेश आपल्या सैन्याला दिले. मोदींना यासाठी निवृत्त जनरल मंत्री वीके सिंह यांना येमेनला पाठविले. भारताने फक्त भारतीयांनाच नाही तर अमेरिका, इंग्‍लैंड, फ्रांस आणि जर्मनीसारख्या नागरिकांनाही येमेनच्या बाहेर आणले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीsaudi arabiaसौदी अरेबियाwarयुद्ध