शेतात बैल गेल्याच्या कारणावरुन विळ्याने वार
By Admin | Updated: October 21, 2016 00:17 IST2016-10-21T00:17:28+5:302016-10-21T00:17:28+5:30
जळगाव: शेतात बैलाचा पाय पडल्याने त्यात कापसाचे नुकसान झाल्याच्या कारणावरुन दगडू देवराम पाटील व अलका दगडू पाटील यांनी रवींद्र नामदेव पाटील यांच्या पोटावर विळ्याने वार केल्याची घटना धानवड तांडा ता.जळगाव येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाद सोडविण्यास आलेली रवींद्र पाटील यांची पत्नी प्रभाबाई यांनाही शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

शेतात बैल गेल्याच्या कारणावरुन विळ्याने वार
ज गाव: शेतात बैलाचा पाय पडल्याने त्यात कापसाचे नुकसान झाल्याच्या कारणावरुन दगडू देवराम पाटील व अलका दगडू पाटील यांनी रवींद्र नामदेव पाटील यांच्या पोटावर विळ्याने वार केल्याची घटना धानवड तांडा ता.जळगाव येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाद सोडविण्यास आलेली रवींद्र पाटील यांची पत्नी प्रभाबाई यांनाही शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.