शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बायको हवी हुशार अन् प्रेमळ, योग्य मुलगी सापडेल तेव्हा लग्न करणार: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 06:37 IST

‘जेव्हा योग्य मुलगी सापडेल, तेव्हा लग्न करणार.  आपल्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते, त्यामुळे आयुष्याच्या जोडीदाराकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत,’

नवी दिल्ली :

‘जेव्हा योग्य मुलगी सापडेल, तेव्हा लग्न करणार.  आपल्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते, त्यामुळे आयुष्याच्या जोडीदाराकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत,’ असे दिलखुलास मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

‘कर्ली टेल्स’ या युट्यूबवरील खाद्य आणि भ्रमंती प्लॅटफॉर्मशी केलेल्या हलक्या-फुलक्या संभाषणात, राहुल गांधी यांनी त्याच्या बालपणीच्या आठवणींपासून ते आवडते पदार्थ आणि व्यायामाबद्दलच्या प्रेमापर्यंत अनेक गैर-राजकारण विषयांवर चर्चा केली. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, त्यांना लग्न करण्यात कोणतीही अडचण नाही, परंतु वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते व त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यामुळे माझ्या अपेक्षा खूप जास्त आहेत. जोडीदार म्हणून एक प्रेमळ मुलगी हवी आहे, जी समजूतदार असावी, असेही ते म्हणाले. 

पंतप्रधान झाल्यावर काय करणार?पंतप्रधान झालो तर शिक्षण व्यवस्था बदलणार, लघू व मध्यम उद्योगांना मदत करणार, शेतकरी व बेरोजगार तरुणांसारख्या कठीण काळातून जात असलेल्या लोकांना मदत करणार, असा तीन कलमी कार्यक्रम त्यांनी सांगितला.

राजकीय अजेंड्यासाठी भाजपकडून वापर स्थलांतरित काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सांबा जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान भेट घेतली. भाजप आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी समुदायाचा वापर करीत आहे. त्यांना काश्मिरी पंडितांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, धर्माच्या आधारावर द्वेष पसरविणे हा त्यांचा राजकीय अजेंडा आहे, असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा