शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट गेमिंगमध्ये करिअर? या महत्त्वाच्या टीप्स नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 13:51 IST

इंटरनेट गेम्स हे आता नवे करिअर विश्व झाले आहे. यामध्ये करिअर करण्याच्या अनंत संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकडे एक रोजगाराचे साधन म्हणून पाहाता येईल.

मुंबई- दोन दशकांमध्ये बैठ्या खेळांच्या क्षेत्रातही मोठी क्रांती झालेली आहे. व्यापार, सापशिडी, पत्ते हे खेळ जाऊन इलेक्ट्रॉनिक गेम्स खेळण्याचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध झाले. हँडगेम्सपासून सुरुवात होऊन टीव्ही गेम्स आले, त्यानंतर आता इंटरनेट गेम्सची सुरुवात झाली. ब्रिक गेम, व्हीडिओ गेम हे गेम आजही तुमच्या लक्षात असतील. पण इंटरनेट गेम्स हे आता नवे विश्व झाले आहे. यामध्ये करिअर करण्याच्या अनंत संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकडे एक रोजगाराचे साधन म्हणून पाहाता येईल.

गेमिंग उद्योगाची व्याप्ती आणि संधीहा उद्योग 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त उलाढाल करत असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतातील गेमिंग उद्योग हा अंदाजे 2000 कोटी पर्यंत व्यवसाय करत असावा. भारताची लोकसंख्या 135 कोटी इतकी असून त्यातील दोन तृतियांश लोक पस्तिशीच्या आत आहेत. म्हणजेच गेम्स खेळणाऱ्या लोकांची संख्या मोठी असून त्याकडे आकृष्ट होऊ शकतील अशाही लोकांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे.

गेमिंग व्यवसाय कसा होईल?गेमिंग हा केवळ उद्योग नसून तो नवनवी करिअर्स तयार करत आहे. या उद्योगात गेम आर्ट प्रोफेशनल्सची मोठी गरज आज भासत आहे. यामध्ये गेम अॅनिमेशन, टूडी किंवा 3डी गेम आर्ट निर्मिती, गेम डिझायनिंग, गेम टेस्टिंग, गेम प्रोग्रामिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, जनरल मॅनेजमेंट अशी करिअर्स उपलब्ध आहेत.

गेमिंग क्षेत्रात येण्यासाठी अभ्यासक्रम कोणते?गेमिंग क्षेत्रात काम करायचे असल्यास बॅचलर ऑफ फाईन आर्टचा अभ्यासक्रम विद्यार्थी निवडू शकतात. याबरोबरच प्रत्यक्षात या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी संपर्क करून आवश्यक माहिती व ज्ञान मिळवणेही तितकेच आवश्यक आहे.

गेमिंग क्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्येगेम आर्ट क्रिएशनमध्ये करिअर करताना काही तंत्रांचा, कौशल्याचा वापर करता येणं आवश्यक आहे. यामध्ये माया, मॅक्स, फोटोशॉप, झी ब्रश, सबस्टन्स डिझाइनर अशी तंत्र तुम्हाला वापरता येणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन