इंटरनेट गेमिंगमध्ये करिअर? या महत्त्वाच्या टीप्स नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 01:43 PM2018-07-18T13:43:36+5:302018-07-18T13:51:21+5:30

इंटरनेट गेम्स हे आता नवे करिअर विश्व झाले आहे. यामध्ये करिअर करण्याच्या अनंत संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकडे एक रोजगाराचे साधन म्हणून पाहाता येईल.

Want To Pursue A Career In Gaming Industry? Here are tips you need to know | इंटरनेट गेमिंगमध्ये करिअर? या महत्त्वाच्या टीप्स नक्की वाचा

इंटरनेट गेमिंगमध्ये करिअर? या महत्त्वाच्या टीप्स नक्की वाचा

मुंबई- दोन दशकांमध्ये बैठ्या खेळांच्या क्षेत्रातही मोठी क्रांती झालेली आहे. व्यापार, सापशिडी, पत्ते हे खेळ जाऊन इलेक्ट्रॉनिक गेम्स खेळण्याचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध झाले. हँडगेम्सपासून सुरुवात होऊन टीव्ही गेम्स आले, त्यानंतर आता इंटरनेट गेम्सची सुरुवात झाली. ब्रिक गेम, व्हीडिओ गेम हे गेम आजही तुमच्या लक्षात असतील. पण इंटरनेट गेम्स हे आता नवे विश्व झाले आहे. यामध्ये करिअर करण्याच्या अनंत संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकडे एक रोजगाराचे साधन म्हणून पाहाता येईल.

गेमिंग उद्योगाची व्याप्ती आणि संधी
हा उद्योग 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त उलाढाल करत असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतातील गेमिंग उद्योग हा अंदाजे 2000 कोटी पर्यंत व्यवसाय करत असावा. भारताची लोकसंख्या 135 कोटी इतकी असून त्यातील दोन तृतियांश लोक पस्तिशीच्या आत आहेत. म्हणजेच गेम्स खेळणाऱ्या लोकांची संख्या मोठी असून त्याकडे आकृष्ट होऊ शकतील अशाही लोकांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे.

गेमिंग व्यवसाय कसा होईल?
गेमिंग हा केवळ उद्योग नसून तो नवनवी करिअर्स तयार करत आहे. या उद्योगात गेम आर्ट प्रोफेशनल्सची मोठी गरज आज भासत आहे. यामध्ये गेम अॅनिमेशन, टूडी किंवा 3डी गेम आर्ट निर्मिती, गेम डिझायनिंग, गेम टेस्टिंग, गेम प्रोग्रामिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, जनरल मॅनेजमेंट अशी करिअर्स उपलब्ध आहेत.

गेमिंग क्षेत्रात येण्यासाठी अभ्यासक्रम कोणते?
गेमिंग क्षेत्रात काम करायचे असल्यास बॅचलर ऑफ फाईन आर्टचा अभ्यासक्रम विद्यार्थी निवडू शकतात. याबरोबरच प्रत्यक्षात या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी संपर्क करून आवश्यक माहिती व ज्ञान मिळवणेही तितकेच आवश्यक आहे.

गेमिंग क्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्ये
गेम आर्ट क्रिएशनमध्ये करिअर करताना काही तंत्रांचा, कौशल्याचा वापर करता येणं आवश्यक आहे. यामध्ये माया, मॅक्स, फोटोशॉप, झी ब्रश, सबस्टन्स डिझाइनर अशी तंत्र तुम्हाला वापरता येणं गरजेचं आहे. 

Web Title: Want To Pursue A Career In Gaming Industry? Here are tips you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.