वणी दहशतवादी नव्हे तर हुतात्मा, पीडीपी आमदाराकडून वणीचं उदात्तीकरण
By Admin | Updated: August 9, 2016 18:06 IST2016-08-09T18:06:12+5:302016-08-09T18:06:12+5:30
बु-हान वणी हा दहशतवादी नसून हुतात्मा असल्याची गरळ सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते मुश्ताक अहमद शाह यांनी ओकली

वणी दहशतवादी नव्हे तर हुतात्मा, पीडीपी आमदाराकडून वणीचं उदात्तीकरण
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 9 - जम्मू-काश्मीरमध्ये खात्मा करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बु-हान वणी हा दहशतवादी नसून हुतात्मा असल्याची गरळ सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते मुश्ताक अहमद शाह यांनी ओकली आहे. या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शाह यांनी त्याचं उदात्तीकरण करताना तो धर्मनिष्ठ आणि चांगला माणूस असल्याचंही म्हटलं आहे. "मी स्वतः त्रालचा रहिवासी असल्यामुळे मला माहीत आहे की, लोकांमध्ये बुऱ्हान वणी याच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. त्याच्या मृत्यूबद्दल लोकांनी शोक व्यक्त करणे समर्थनीय आहे," असं मतही या आमदारानं मांडलं आहे.
बु-हान वाणीच्या कुटुंबीयांना या आधीच्या सरकारनं म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीनं खूप त्रास दिल्याचंही हे आमदार म्हणाले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या सरकारमुळेच बु-हान वणी दहशतवादाच्या विळख्यात अडकल्याचाही आरोप मुश्ताक अहमद शाह यांनी केला आहे.