CoronaVirus : तामिळनाडू-आंध्र प्रदेश सीमेवर उभारली भिंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:46 AM2020-04-28T03:46:21+5:302020-04-28T06:20:08+5:30

वेल्लोर जिल्ह्यात दोन ठिकाणी तपासणी नाक्यांजवळ ३ ते ७ फूट उंच भिंती उभारण्यात येत आहेत. राज्यांच्या सीमेवर भिंत उभारण्याची घटना देशात प्रथमच घडत आहे.

Wall erected on Tamil Nadu-Andhra Pradesh border | CoronaVirus : तामिळनाडू-आंध्र प्रदेश सीमेवर उभारली भिंत

CoronaVirus : तामिळनाडू-आंध्र प्रदेश सीमेवर उभारली भिंत

googlenewsNext

वेल्लोर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन काळात वाहनांच्या मोठ्या वाहतुकीवर नियंत्रण राखण्यासाठी तमिळनाडू-आंध्र प्रदेशच्या सीमेवर वेल्लोर जिल्ह्यात दोन ठिकाणी तपासणी नाक्यांजवळ ३ ते ७ फूट उंच भिंती उभारण्यात येत आहेत. राज्यांच्या सीमेवर भिंत उभारण्याची घटना देशात प्रथमच घडत आहे.
सैनागुंता व पोन्नई या दोन ठिकाणच्या तपासणी नाक्यांजवळ या भिंती उभारण्याचे काम रविवारी सकाळपासून सुरू झाले. अन्य राज्यांतील वाहनांनी या दोन तपासणी नाक्यांवरू न वेल्लोरमध्ये प्रवेश करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. पतथालपल्ली, परादारामी, सेरकाडू आदी चार ठिकाणचे तपासणी नाके मात्र खुले ठेवण्यात आले असून, तेथून वाहनांना तमिळनाडूमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.
वेल्लोरमध्ये येणाऱ्यांनी वैद्यकीय केंद्रामध्ये आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यांना निकाल येईपर्यंत क्वारंटाइन राहावे लागेल. तमिळनाडू-आंध्र सीमेवर वेल्लोर जिल्ह्यात सेराकडू माध्यमिक शाळा, पारादारामी येथील सरकारी शाळा, पतथालपल्ली येथील सरकारी शाळेत क्वारंटाइनची व्यवस्था केली आहे. पुतुथक्कू येथून वेल्लोरमध्ये प्रवेश करणाºयांना अलमेलूमनगापुरम येथील केजीएन मंगलकार्यालयात क्वारंटाइन केले जाणार आहे.
>वाढत्या रुग्णांची चिंता
तमिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तमिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे असे वाटत असतानाच, काही दिवसांपूर्वी तेथील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांना दूरध्वनी करून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली होती.

Web Title: Wall erected on Tamil Nadu-Andhra Pradesh border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.