वाळूज वृत्त रेग्युलर १

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:20+5:302015-02-14T23:50:20+5:30

बजाजनगरातील कचर्‍यावरून एमआयडीसी व ग्रामपंचायतीमध्ये कलगीतुरा रंगला

Walaj circle Regular 1 | वाळूज वृत्त रेग्युलर १

वाळूज वृत्त रेग्युलर १

ाजनगरातील कचर्‍यावरून एमआयडीसी व ग्रामपंचायतीमध्ये कलगीतुरा रंगला
- आपच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी
-जमा केलेला ट्रॅक्टरभर कचरा एमआयडीसी व ग्रामपंचायतीसमोर टाकला
वाळूज महानगर- तीन दिवसांपासून बजाजनगरात कचरा उचलला जात नसल्यामुळे आज आपच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत गोळा केलेला कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून एमआयडीसी व वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीसमोर खाली करीत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
बजाजनगरात सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासन गेल्या २० वर्षांपासून पार पडत आहेत. मात्र, सहा महिन्यांपूर्वी डेंग्यूमुळे बजाजनगर परिसरातील चार-पाच जणांचा मृत्यू झाला होता. अस्वच्छतेमुळे अनेकांचा बळी गेल्याचा आरोप करीत विविध पक्ष व संघटनांच्या वतीने एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. या प्रकरणामुळे धसका घेतलेल्या एमआयडीसी प्रशासनाने स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचे सांगत कचरा उचलण्यास असमर्थता दर्शवली होती. या कचर्‍याच्या प्रश्नावरून एमआयडीसी प्रशासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करून कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीला निर्देश देण्यास भाग पाडले होते. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाने ऑगस्ट २०१४ मध्ये ग्रामपंचायतीला आदेश देऊनही ग्रामपंचायतीने पुढाकार न घेतल्यामुळे तीन दिवसांपूर्वी एमआयडीसी प्रशासनाने कचरा उचलणे बंद केले होते.
आपच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
कचरा उचलला जात नसल्यामुळे आम आदमी पक्षाचे प्रकाश जाधव, सुरेश फुलारे, अरविंद बोरकर, भगवान जाधव, भरत फुलारे, बाळू चरबरे, रमेश पगारे आदींनी गांधीगिरी करीत विविध सोसायटीत जाऊन केरकचरा गोळा केला. हा जमा झालेला केरकचरा ट्रॅक्टरमध्ये भरून आपच्या कार्यकर्त्यांनी एमआयडीसी व ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा कचरा एमआयडीसी व ग्रामपंचायत कार्यालयासमोर फेकून देत निषेध केला. आपच्या या गांधीगिरी आंदोलनाची शनिवारी वाळूज महानगरात जोरदार चर्चा सुरूहोती.
फोटो ओळ-बजाजनगरातील कचर्‍यावरून एमआयडीसी प्रशासन व वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीमध्ये वाद सुरूअसल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत जमा झालेला कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून ग्रामपंचायतसमोर खाली करीत निषेध व्यक्त केला.
फोटो क्रमांक-१४ फेब्रु- आंदोलन

Web Title: Walaj circle Regular 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.