मोबाईल जप्त केल्याच्या रागात लष्करी जवानाने मेजरला ठार मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:29 IST2017-07-19T00:29:05+5:302017-07-19T00:29:05+5:30
ड्युटीवर असताना मोबाईल फोनवरून बोलल्याबद्दल खडसावणाऱ्या अधिकाऱ्यास लष्करातील एका जवानाने रागाच्या भरात गोळ््या घालून ठार केल्याची घटना सोमवारी

मोबाईल जप्त केल्याच्या रागात लष्करी जवानाने मेजरला ठार मारले
श्रीनगर : ड्युटीवर असताना मोबाईल फोनवरून बोलल्याबद्दल खडसावणाऱ्या अधिकाऱ्यास लष्करातील एका जवानाने
रागाच्या भरात गोळ््या घालून ठार केल्याची घटना सोमवारी
सायंकाळी काश्मिरमध्ये पाकिस्तान सीमेलगत असलेल्या उरी जिल्ह्यात घडली.
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव मेजर शिखर थापा असे असून त्यांना कथीरेसन या जवानाने पाठीमागून गोळ््या घातल्या. मेजर थापा मूळचे ८ राष्ट्रीय रायफल्स या बटालियनचे होते व उरी येथे घुसखोरविरोधी कारवाईसाठी त्यांना ७१ व्या सशस्त्र रेजिमेंटमध्ये नेमण्यात आले होते.
प्रवक्त्याने सांगितले की, मेजर थापा त्यांच्या फलटणीतील जवानांच्या कामाची पाहणी करण्यासाठी फेरफटका मारत असताना त्यांना कथीरेसन हा
जवान मोबाइल फोनवर बोलत असताना दिसला. त्यांनी या
जवानाला खडसावले व त्याचा मोबाइल काढून घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत मोबाइल खाली पडला व त्याच्या स्क्रीनला तडा गेला. पाठीमागे उभ्या असलेल्या कथीरेसनला याचा एवढा राग आला की त्याने हातातील एके-४७ रायफलच्या दोन फैरी मेजर थापा यांच्यावर झाडल्या. यात मेजर थापा यांचा जागीच मृत्यू झाला.
कथीरेसन यास लष्करी पोलिसांच्या हवाली करण्यात
आले असून ते अधिक तपास करीत आहेत. (वृत्तसंस्था)