शतायुषी न्या. कृष्णा अय्यर कालवश
By Admin | Updated: December 6, 2014 02:39 IST2014-12-06T02:39:44+5:302014-12-06T02:39:44+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांचे गुरुवारी दुपारी ३.३० वाजता निधन झाले.

शतायुषी न्या. कृष्णा अय्यर कालवश
कोची : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांचे गुरुवारी दुपारी ३.३० वाजता निधन झाले.
डाव्या विचारसरणीचा पगडा असलेले न्या. अय्यर हे नेहमी दुर्बल घटकांच्या हक्कासाठी उभे ठाकले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना जामिनाची पुनर्व्याख्या केली होती. १३ नोव्हेंबर रोजी त्यांनी शंभरावा वाढदिवस साजरा केला. २४ नोव्हेंबर रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अय्यर यांचा जन्म केरळमधील पलाकड येथे झाला. ईएमएस नम्बुद्रीपाद यांच्या नेतृत्वातील पहिल्या लोकशाही सरकारमध्ये ते मंत्री राहिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सात वर्षे न्यायाधीश असताना त्यांनी कच्च्या कैद्यांना अनुकूल अशी जामिनाची व्याख्या केली. सर्वसाधारण नियमांनुसार प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेला त्यांचा विरोध होता. २००२ मधील गुजरात दंगलीनंतर त्यांनी मोदींवर टीका केली होती. मोदींनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)