शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१२३ भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील खटल्यांना संमतीची केंद्रीय दक्षता आयोगाला प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 07:27 IST

४५ जण बँकांशी संबंधित; आयएएस, सीबीआयचे अधिकारीही

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या १२३ वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवर खटले चालविण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) करीत आहे. खटल्यांच्या मंजुरीचे प्रस्ताव ४ महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून सरकारकडे पडून आहेत. सूत्रांनी सांगितले की, यातील ४५ जण विविध सरकारी बँकांचे अधिकारी आहेत. याशिवाय आयएएस अधिकारी तसेच सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभाग यासारख्या तपास संस्थांचे अधिकारी यांचा त्यात समावेश आहे.

वास्तविक खटल्याच्या प्रस्तावास चार महिन्यांत मंजुरी देणे बंधनकारक आहे. या खटल्यांच्या परवानग्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळापासून रखडल्या आहेत. ५७ खटले विविध सरकारी संस्थांतील अधिकाºयांशी संबंधित आहेत. सर्वाधिक आठ खटले कार्मिक मंत्रालयाशी संबंधित आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक प्रकरणांत हे मंत्रालय केंद्रक विभाग म्हणून काम करते. प्रत्येकी पाच प्रकरणे रेल्वे मंत्रालयाशी व उत्तर प्रदेश सरकारशी संबंधित आहेत. सीबीआयचा एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ईडीचा सहायक संचालक आणि एक आयकर अधिकारी यांच्याविरोधातील खटल्यांच्या मंजुºयाही रखडल्या आहेत.सात खटल्यांत १६ आरोपीसूत्रांनी सांगितले की, बँकांशी संबंधित ४५ खटल्यांपैकी सर्वाधिक १५ खटले स्टेट बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक आणि ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स यांच्या अधिकाºयांवरील आहेत.अन्य सात खटल्यांत १६ आरोपी असून त्यात सरकारचा कार्मिक विभाग, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ बडोदा आणि सिंडिकेट बँक यांच्या अधिकाºयांचा समावेश आहे. या खटल्यांत परवानगीची गरज नसल्याचे आयोग व सरकारी विभाग अथवा संस्था यांची सहमती झाली आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय