शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भारतात महिलांना दिल्या जाणाऱ्या वेतनात होत आहे झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:12 IST

आयएलओचा अहवाल; एकाच कामासाठी पुरुषांपेक्षा कमी पगार

नवी दिल्ली : भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत मिळणारे वेतन झपाट्याने वाढत आहे. स्त्री-पुरुषांच्या वेतनातील तफावत आता बरीच कमी झाली असली, तरी एकाच कामासाठी महिलांना अजूनही खूपच कमी वेतन दिले जाते हे वास्तव आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, १९९३-९४ ते २०११-१२ या काळात भारतातील महिलांच्या वेतनात झपाट्याने वाढ झाली आहे. असंघटित क्षेत्रातील वेतनात संघटित क्षेत्रातील वेतनापेक्षा जास्त वाढ झाली आहे. संघटित क्षेत्रात रोजगार वाढला असला, तरी बहुतांश रोजगार कायमस्वरूपी नाहीत.

अहवालात म्हटले आहे की, नियमित/वेतनधारी कर्मचाºयांत महिलांच्या सहभागाचा वार्षिक दर १९९३-९४ मध्ये २.९ टक्के होता. २०११-१२ मध्ये तो जवळपास दुपटीने वाढून ४.७ टक्के झाला. राज्य, उद्योग आणि व्यवसाय अशा सर्व पातळ्यांवर वेतनातील स्त्री-पुरुष भेद कमी झाला आहे. वेतन विस्ताराची गुणवत्ताही वाढली आहे.आंतरराष्ट्रीय मानकांच्या तुलनेत मात्र ही तफावत अजूनही खूप अधिक आहे. भारतातील स्त्री-पुरुष वेतनातील तफावत १९९३-९४ मध्ये ४८ टक्के होती. ती २०११-१२ मध्ये घटून ३४ टक्के झाली. ही तफावत नियमित आणि हंगामी, शहरी आणि ग्रामीण अशा सर्व क्षेत्रांत आहे.६२ टक्के लोक हंगामीअहवालानुसार, भारताच्या ग्रामीण भागातील महिलांचे किमान वेतन प्रतिदिन अवघे १०४ रुपये आहे. अल्प-कौशल्य व्यवसायांत महिलांचे प्रमाण अधिक आहे. सन १९८३ ते २०११-१२ या काळात महिला या क्षेत्रात अधिक प्रमाणात येत गेल्या. अहवालात म्हटले की, २०११-१२ मध्ये स्वयंरोजगार असलेल्या लोकांचे प्रमाण ५१.४ टक्के आहे. वेतनधारी रोजगार असलेल्या १२१ दशलक्ष लोकांपैकी १९५ दशलक्ष अथवा सुमारे ६२ टक्के लोक हंगामीस्वरूपात म्हणून काम करतात.

टॅग्स :Womenमहिलाjobनोकरीbusinessव्यवसाय