शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

‘व्योममित्रा’ करणार अवकाश सफर, गगनयान मोहीम डिसेंबर २0२१ मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 05:19 IST

गगनयान ही भारताची पहिली अंतराळ मोहीम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्णत्वास जाणार असून, त्यापूर्वी ‘व्योममित्रा’ ही महिला रोबो (ह्युमनॉईड) अंतराळ सफर करणार आहे.

बंगळुरू : गगनयान ही भारताची पहिली अंतराळ मोहीम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्णत्वास जाणार असून, त्यापूर्वी ‘व्योममित्रा’ ही महिला रोबो (ह्युमनॉईड) अंतराळ सफर करणार आहे. बुधवारी तिची पहिली झलक पाहून सर्व भारतीय आनंदले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.‘मानवी अंतराळ मोहीम आणि संशोधन : विद्यमान आव्हाने आणि भविष्याकडे वाटचाल’च्या उद्घाटन सत्रात ‘व्योममित्रा’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोन संस्कृत शब्द व्योम (अंतराळ) आणि मित्र (मित्र) हे दोन्ही शब्द मिळून व्योममित्रा हा शब्द तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात रोबोने स्वत:ची ओळख करून दिल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले. भारतीय अंतराळवीरांना ‘गगनयान’ अंतराळात नेण्यापूर्वी ‘व्योममित्रा’ अंतराळात जाणार आहे. (वृत्तसंस्था)मोहिमेत अंतराळवीरांची साथ करणारती म्हणाली- सर्वांना नमस्कार, मी व्योममित्रा आहे. मला अर्ध मानव रोबोच्या रूपात पहिल्या गगनयान या मानवरहित अंतराळ मोहिमेसाठी तयार करण्यात आले आहे.आपणाला सतर्क करणार आहे व जीवनरक्षक प्रणालीवर लक्ष ठेवणार आहे. मी स्वीच पॅनलच्या संचालनासह अनेक काम करणार आहे. मी अंतराळ मोहिमेत अंतराळवीरांची साथ करणार असून, त्यांच्याशी संभाषणही करेन.इस्रोकडून २०२० मध्ये पहिली मानवरहित मोहीमगगनयान मोहिमेच्या तयारीबाबत इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, व्योममित्रा अंतराळात मानवाप्रमाणे काम करील. सर्व प्रणाली व्यवस्थितरीत्या काम करीत आहेत की नाही, यावर ती नजर ठेवील. ही खूप मोठी उपलब्धी आहे. भारत डिसेंबर २०२१ च्या मानवी अंतराळ मोहिमेपूर्वी डिसेंबर २०२० व जून २०२१ मध्ये दोन मानवरहित मोहिमा राबवणार आहे.भारताच्या गगनयान मोहिमेचा उद्देश केवळ अंतराळात भारताचे पहिले मानवी अंतराळ यान पाठवणे हा नसून, अंतराळात कायमस्वरूपी मानवाचे अस्त्वित्व ठेवण्यासाठी नवीन अंतराळ केंद्र स्थापित करणे हाही आहे. याबाबत भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बंगळुरूजवळ अंतराळरीवांसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात आले आहे.इस्रो सध्या नासा व इतर अंतराळ संस्था, तसेच इतर उद्योगांशीही चर्चा करीत आहे. त्यांच्या अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकता येईल, यासाठी हा प्रयत्न आहे.गगनयान आंतरग्रहीय मोहिमेच्या दीर्घकालीन लक्ष्यप्राप्तीसाठीही फायदेशीर ठरणार आहे. गगनयानला एका कक्षेत पोहोचवणारा १० टन पेलोड क्षमतेचा संरचनात्मक लाँचर यापूर्वीच तयार करण्यात आलेला आहे. आता मानवी जीवन विज्ञान व जीवनरक्षक प्रणालीवर काम सुरू आहे.गगनयान मोहिमेत अनेक राष्टÑीय प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) प्रयोगशाळा, भारतीय हवाई दल, सीएसआयआर प्रयोगशाळांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली आहे.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत