‘व्यापमं’ घोटाळा केवळ सुरुवात

By Admin | Updated: June 24, 2014 02:08 IST2014-06-24T02:08:01+5:302014-06-24T02:08:01+5:30

मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याच्या आरोपांवरून काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्ला चालविला आह़े ‘

The 'vyhamam' scam is just the beginning | ‘व्यापमं’ घोटाळा केवळ सुरुवात

‘व्यापमं’ घोटाळा केवळ सुरुवात

>नवी दिल्ली : मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याच्या आरोपांवरून काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्ला चालविला आह़े ‘व्यापमं’ घोटाळा ही तर केवळ सुरुवात आह़े आता संशयाची सुई मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे वळली आहे, अशी टीका मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली़
दरम्यान, या आरोपांमुळे विचलित न होता लवकरच याप्रकरणी आपण मानहानी दावा दाखल करणार असल्याचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले  आह़े
दिग्विजय सिंह यांनी आज सोमवारी दिवसभर वेगवेगळे टि¦ट करून व्यापमं घोटाळ्याचा मुद्दा लावून धरला़  ‘व्यापमं’ घोटाळ्यावर अद्याप भाजपा वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही़ आता समोर आलेला घोटाळा केवळ एक सुरुवात आह़े एमबीबीएसमध्ये प्रत्येक नियुक्ती आणि भरतीची छाननी व्हायला हवी़ आता संशयाची सुई मुख्यमंत्र्यांकडे वळली आहे, असे दिग्विजय सिंह यांनी एका टि¦टमध्ये म्हटल़े आता हिंदी वृत्तवाहिन्या मध्यप्रदेश व चंदीगडमधील ‘व्यापमं’ घोटाळ्यावर लक्ष देत आहेत़ उमा भारती यांनी हा चारा घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचे म्हटले आहे, असे अन्य एका टि¦टमध्ये त्यांनी म्हटल़े 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: The 'vyhamam' scam is just the beginning