शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

व्यापम घोटाळा उघडकीस आणणाऱ्यालाच तुरुंगवास होतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 15:25 IST

आशीष चतुर्वेदी याचा 200 रुपयांचा दंड भरण्यास नकार

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशमधील सर्वांत भयानक अशा व्यापम घोटाळ्याला 2013 मध्ये वाचा फोडणाऱ्या माहिती अधिकार कायकर्त्याला सीबीआय न्यायालयाने गुरुवारी 15 दिवसांसाठी तुरुंगात पाठविले. सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आशीष चतुर्वेदी याला 200 रुपयांचा दंड आकारला होता. मात्र, दंड भरण्यास नकार दिल्याने न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठविले आहे. आशीष चतुर्वेदी याने व्यापम घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल यादव याच्याविरोधात साक्ष देण्यास नकार दिला होता. या प्रकरणात आतापर्यंत 29 जणांनी आपली साक्ष नोंदवली आहे. अद्याप काही लोकांची साक्ष बाकी आहे. या सर्वांची साक्ष झाल्यावरच आपण साक्ष नोंदवू , अशी मागणी आशीषने केली होती. यामुळे त्याला सीबीआय न्यायालयाने साक्षीला बोलावूनही साक्ष देण्यास नकार दिला होता. यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात दोनदा अटक करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी पोलिसांनी त्याला सीबीआय न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला 200 रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, आशीष याने दंड भरण्यास नकार दिल्याने न्यायालयाने 15 दिवसांची िशक्षा सुनावली.

काय आहे व्यापम घोटाळा?मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठय़ा गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये आजवर २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठ्या नेत्यांसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली आहे. 2009 मध्ये या घोटाळ्याला सुरुवात झाली होती. 2013 मध्ये याला वाचा फुटली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग