लोकसभेत ‘वी वॉन्ट जस्टिस’चे नारे; कामकाज 1क् मिनिटांसाठी तहकूब

By Admin | Updated: August 7, 2014 00:35 IST2014-08-07T00:35:33+5:302014-08-07T00:35:33+5:30

देशातील सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस सदस्य आज बुधवारी लोकसभेत जोरदार नारेबाजी करताना दिसल़े

Voting Justice slogans in Lok Sabha; Functioned for one minute | लोकसभेत ‘वी वॉन्ट जस्टिस’चे नारे; कामकाज 1क् मिनिटांसाठी तहकूब

लोकसभेत ‘वी वॉन्ट जस्टिस’चे नारे; कामकाज 1क् मिनिटांसाठी तहकूब

>नवी दिल्ली : देशातील सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस सदस्य आज बुधवारी लोकसभेत जोरदार नारेबाजी करताना दिसल़े काँग्रेस सदस्यांच्या या गोंधळामुळे सभागृहाचे 
कामकाज 1क् मिनिटांसाठी स्थगित करावे लागल़े
कार्यस्थगन प्रस्तावाची नोटीस देत प्रश्नोत्तराच्या तासात सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केली़ मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा उपस्थित करण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केल़े यामुळे काँग्रेस, राजद, जदयू, आम आदमी पार्टीचे सदस्य आक्रमक झाले आणि लोकसभाध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन नारेबाजी करू लागल़े राहुल गांधीही या सदस्यांना येऊन मिळाल़े ‘तानाशाही नहीं चलेगी, वी वॉन्ट जस्टिस, प्रधानमंत्री जवाब दो’ असे नारे देताना ते दिसल़े राहुल गांधी ही नारेबाजी करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होत़े याचदरम्यान संसदीय कामकाज मंत्री एम़ वेंकय्या नायडू बोलायला उभे राहिल़े देशात कुठल्याही प्रकारचा सांप्रदायिक तणाव नाही़ अनावश्यक समस्या निर्माण करू नका, असे म्हणाल़े याउपरही विरोधकांची नारेबाजी सुरू राहिली़ या गोंधळातच लोकसभाध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास आटोपला  आणि अखेर गोंधळ न थांबल्यामुळे सभागृहाचे कामकाज 1क् मिनिटांसाठी स्थगित केल़े 
दहा मिनिटानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा पंतप्रधान सभागृहात नव्हत़े यावर विरोधी सदस्यांनी ‘प्रधानमंत्री कहां गये, अच्छे दिन कहां गये’ अशी विचारणा केली़ 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
‘मी नेहमीच बोलतो’
राहुल गांधी आज पहिल्यांदा संसदेत आक्रमक झालेले दिसले, याबाबत पत्रकारांशी छेडले असता, मी आजच नाही तर अनेकदा संसदेत आवाज उठवला आहे, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिसल़े
 
सोनियाही सक्रिय!
काँग्रेस सदस्य लोकसभेत आक्रमक झाले असताना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी अप्रत्यक्षपणो ‘सक्रिय’ झालेल्या दिसल्या़ नारेबाजीदरम्यान राहुल गांधी अनेकदा सोनियांजवळ येऊन बोलताना दिसल़े तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांच्याशीही त्या काही मिनिटे चर्चा करताना दिसल्या़
 
भाजपाकडून निंदा 
राहुल गांधी यांच्या लोकसभाध्यक्षांविरुद्धच्या आरोपाची भाजपाने तेवढय़ाच कठोर शब्दांत निंदा केली़ राहुल गांधी लोकसभेचे ज्येष्ठ सदस्य आहेत़ लोकसभाध्यक्षांविरुद्ध त्यांनी केलेली टीप्पणी असभ्य व संसदीय परंपरांविरुद्ध आह़े असे आरोप करून ते स्वत:ची उपस्थिती नोंदवू इच्छितात़ नैराश्यातून त्यांचे हे उपद्व्याप सुरू आहेत, असे भाजप नेते राजीव प्रताप रुडी म्हणाल़े 
 

Web Title: Voting Justice slogans in Lok Sabha; Functioned for one minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.