शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 21:38 IST

Digital Voter-ID Cards: निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे.

नवी दिल्ली : मतदार ओळखपत्र आता डिजिटल झाले आहे. ते तुम्ही आपल्या मोबाइल, कम्प्यूटरवर डाऊनलोड करु शकणार आहात. निवडणूक आयोग सोमवारी म्हणजेच २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ई-मतदार ओळखपत्र (Electronic Electoral Photo Identity Card) लाँच करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे ई-ईपीआयसी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील आणि पाच नवीन मतदारांना ई-ईपीआयसी आणि मतदार ओळखपत्र प्रदान करतील. 

दरम्यान, निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती. याचे औचित्य साधून निवडणूक आयोगाकडून २०११ या वर्षापासून दरवर्षी २५ जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करण्यात येतो. 

e-EPIC म्हणजे काय?e-EPIC एक इडिट न करता येण्यासारखा सुरक्षित पोर्टेबल दस्तऐवज स्वरूप (पीडीएफ) आवृत्ती आहे. यात सिक्युरिटी क्यूआर कोड असेल. ज्यात फोटो आणि अनुक्रमांक, भाग क्रमांक इ. असेल. तुम्ही मोबाइल किंवा संगणकावर वर ई-ईपीआयसी कार्ड डाउनलोड करू शकता. तसेच,  हे कार्ड संगणक आणि डिजिटल संग्रहित केले जाऊ शकते. या सुविधेद्वारे मतदार कोठूनही ऑनलाइन मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकतील.

ई-मतदार ओळखपत्र असे करता येणार- सर्व प्रथम https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/account/login या संकेतस्थळाला भेट द्या. यानंतर तुम्हाला लॉग-इन करावे लागेल. जर तुमचे अकाऊंट नसेल तर मोबाइल नंबरच्या मदतीने तुम्ही अकाऊंट सुरू करु शकता.- वेबसाईटवर लॉग-इन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करा.- २५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.१४ नंतर तुम्ही वोटर आयडी डाऊनलोड करु शकणार आहात.

टॅग्स :VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMobileमोबाइलdigitalडिजिटल