गोव्यात आज मतदान
By Admin | Updated: February 4, 2017 01:22 IST2017-02-04T01:22:26+5:302017-02-04T01:22:26+5:30
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर

गोव्यात आज मतदान
पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.
४० जागांसाठी एकूण २५१ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आम आदमी पार्टी, गोवा फॉरवर्ड, गोवा सुराज, गोवा सुरक्षा मंच व शिवसेनेचे उमेदवार भवितव्य आजमावित आहेत. बहुतेक मतदारसंघात भाजपा-काँग्रेसमध्ये सामना होईल.