शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 12:43 IST

भाजपा नेत्यांकडून प्रियंका गांधींवर टीका सुरुच

पाटणा: सुंदर चेहऱ्यांमुळे मतं मिळत नाहीत, असं भाजपा नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री विनोद नारायण झा यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांची काँग्रेसनं महासचिवपदी नियुक्ती केली. याशिवाय उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचं प्रभारीपदाची जबाबदारीदेखील त्यांना दिली त्यावर भाष्य करताना सुंदर चेहऱ्यांमुळे निवडणुका जिंकता येत नाही, असं झा म्हणाले. प्रियंका भ्रष्ट रॉबर्ट वाड्राची पत्नी आहे. त्याचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं आहे, असंही झा यांनी म्हटलं. प्रियंका गांधी खूप सुंदर आहेत. त्या आता राजकारणात आल्यानं खूप जागा जिंकता येतील, या भ्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहू नये. देशातील लोकशाही आता परिपक्व होत आहे, असं विनोद नारायण झा म्हणाले. अनेकजण सध्या प्रियंका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी करत आहेत. त्यावरही झा यांनी भाष्य केलं. 'काही जणांकडून प्रियंका आणि इंदिरा गांधींची तुलना सुरू आहे. इंदिरा गांधी या फिरोज गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पतीनं लोकसभेत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. मात्र प्रियंकाचं तसं नाही. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं आहे. त्यामुळे प्रियंका आणि इंदिरा गांधी यांची तुलना चुकीची आहे,' असं झा म्हणाले. विनोद नारायण झा बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशावर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनीही भाष्य केलं. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या आघाडीला घाबरवण्यासाठी प्रियंका गांधींनी राजकारणात आणलं गेल्याचं सुशील कुमार मोदी म्हणाले. 'प्रियंका गांधी रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रतिनिधी म्हणून राजकारणात आल्या आहेत. त्यामुळे आता वाड्रा यांचा मुद्दा प्रकाशझोतात येईल,' असं सूचक विधान त्यांनी केलं. 

टॅग्स :Priyanka Chopraप्रियांका चोप्राcongressकाँग्रेसBJPभाजपा