पदवीधरसाठी मतदारांनी फोटो जमा करावेत
By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:39+5:302014-05-10T19:41:39+5:30

पदवीधरसाठी मतदारांनी फोटो जमा करावेत
>* तहसीलदारांचे आवाहनआजरा :भारताच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आजरा तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे फोटो व मतदार छायाचित्र ओळखपत्र नमूद नाही त्यांनी त्वरित मतदान मदत केंद्र आजरा येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ढोकडे यांनी केले आहे.२० मे पूर्वी या मतदार याद्या तयार करण्यात येणार असल्याने त्वरित मतदारांनी संपर्क साधून फोटो व मतदार छायाचित्र ओळखपत्राचा नंबर उपलब्ध करून घ्यावा, असेही तहसीलदार ढोकडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)