पाच राज्यांमध्ये पोटनिवडणुकीत भरघोस मतदान
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:09+5:302015-02-13T23:11:09+5:30
नवी दिल्ली : प. बंगालमधील लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गोव्यात विधानसभेची पोटनिवडणूक भरघोस मतदानासह शांततेत पार पडली. प. बंगालमधील बोनगाव लोकसभा आणि कृष्णागंज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे ७९.८० टक्के आणि ८१.८० टक्के मतदान झाले. या दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत पार पडल्याचे या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील गुप्ता यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणी मुख्य लढत तृणमूल काँग्रेस, माकप, भाजप आणि काँग्रेसमध्ये झाली.

पाच राज्यांमध्ये पोटनिवडणुकीत भरघोस मतदान
न ी दिल्ली : प. बंगालमधील लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गोव्यात विधानसभेची पोटनिवडणूक भरघोस मतदानासह शांततेत पार पडली. प. बंगालमधील बोनगाव लोकसभा आणि कृष्णागंज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे ७९.८० टक्के आणि ८१.८० टक्के मतदान झाले. या दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत पार पडल्याचे या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील गुप्ता यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणी मुख्य लढत तृणमूल काँग्रेस, माकप, भाजप आणि काँग्रेसमध्ये झाली. अरुणाचल प्रदेशच्या प. सियांग जिल्ह्यातील लिरोंबा विधानसभा पोटनिवडणुकीत ७५ टक्के मतदान झाले. या ठिकाणची मतांची अंतिम टक्केवारी आणखी वाढू शकते. तामिळनाडूतील श्रीरंगम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ८२.५४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)