पद्वीधरसाठी राष्ट्रवादीकडून मतदार नोंदणी
By Admin | Updated: October 30, 2016 22:47 IST2016-10-30T22:47:10+5:302016-10-30T22:47:10+5:30
अहमदनगर : नाशिक पद्वीधर निवडणुकीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदार नोंदणी अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. शहरात चार ठिकाणी ही नांेदणी सुरू असून येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

पद्वीधरसाठी राष्ट्रवादीकडून मतदार नोंदणी
अ मदनगर : नाशिक पद्वीधर निवडणुकीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदार नोंदणी अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. शहरात चार ठिकाणी ही नांेदणी सुरू असून येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी शहरातील चितळे रस्ता या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मतदार नोंदणीस सुरूवात झाली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, युवक अध्यक्ष अभिजित खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेशमा आठरे, गटनेते संपत बारस्कर, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षचे कुमार वाकळे, उपमहापौर दीपक सुळ, विपूल शेटीया, संभाजी पवार, बाबा गाडळकर, बाळासाहेब सराईकर, दिलदार सिंग आदी उपस्थित होते. शहरातील स्टेट बँक चौकात अभिषेक कलेक्शन, सिध्दीबाग येथे अपूर्वा कॉम्प्युटर, चितळे रस्ता येथील आमदार जगताप यांचे कार्यालय आणि नगरसेवक वाकळे यांच्या सावेडीतील कार्यालयात ही नांेदणी सुरू आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रवादीचे माणिकराव विधाते, अभिजित खोसे, रेश्मा आठरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...............