शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

खोटे संदेश रोखण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:22 IST

अन्यथा कारवाई करू; रविशंकर प्रसाद यांची कंपनीच्या सीईओला तंबी

नवी दिल्ली : व्हॉटस्अ‍ॅपने भारतात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, तसेच खोट्या संदेशांचा माग काढणारी व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना भारत सरकारने व्हॉटस्अ‍ॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल यांना केली आहे.व्हॉटस्अ‍ॅप सीईओ ख्रिस डॅनियल यांनी मंगळवारी केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसाद यांनी ही माहिती दिली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, व्हॉटस्अ‍ॅपने भारताच्या विविध क्षेत्रात तंत्रज्ञानविषयक योगदान दिले आहे, त्याबद्दल मी डॅनियल यांच्याकडे व्हॉटस्अ‍ॅपची प्रशंसाच केली आहे. तथापि, काही अत्यंत घातक घटनाही व्हॉटस्अ‍ॅपमुळे घडत आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्यांना उत्तेजन देणारे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवरून फिरतात. सूडभावनेतून अश्लील फिती प्रसारित केल्या जात आहेत. हे प्रकार भारतीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. यावर काही तरी उपाय करणे आवश्यक आहे. प्रसाद यांनी सांगितले की, खोटे संदेश हजारो-लाखोंच्या संख्येने प्रसारित होत असतात. त्यावर उपाय शोधला गेला नाही, तर व्हॉटस्अ‍ॅपवर गुन्ह्याला प्रोत्साहित केल्याची कलमे लावली जातील. आपल्या सूचनांवर काम करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.तक्रारी अमेरिकेतून नव्हे; भारतातून हाताळाप्रसाद यांनी सांगितले की, आपण कंपनीकडे काही मुख्य मागण्या केल्या आहेत. त्यात व्हॉटस्अ‍ॅपचे भारतात तक्रार निवारण कार्यालय असायला हवे, भारतीय कायद्यांचे योग्य पालन केले जावे आणि भारतातील प्रश्नाचे अमेरिकेतून उत्तर देण्याची पद्धत बंद केली जावी यासोबत व्हॉटस्अ‍ॅप ही आता भारतातील एक प्रमुख डिजिटल साठवणूक व्यवस्था बनली असल्याने कंपनीची भारतात योग्य औद्योगिक आस्थापना (कॉर्पोरेट एन्टायटी) असली पाहिजे आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपFake Newsफेक न्यूज