आक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक
By Admin | Updated: January 7, 2016 18:15 IST2016-01-07T14:54:43+5:302016-01-07T18:15:50+5:30
विशेष एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे.

आक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ७ - विशेष एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. उत्तरप्रदेशच्या कान्धला शहरातून या अॅडमिनला अटक करण्यात आली.
बाराम सैनी आणि याच ग्रुपचा सदस्य दीपकला कान्धला पोलिसांनी अटक केली.
दोघांविरोधात धर्माच्या आधारावर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली कलम १५३, १५३ अ आणि २९५ अ या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वीही व्हॉटस अॅपचा गैरवापर केल्याबद्दल ग्रुप अॅडमीनन अटक करण्यात आली आहे.