जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची आयडिया

By Admin | Updated: January 30, 2017 18:47 IST2017-01-30T17:58:31+5:302017-01-30T18:47:08+5:30

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या एकत्र येण्याबाबत हालचाली सुरु आहेत.

Vodafone's idea to compete for Xiao | जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची आयडिया

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची आयडिया

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या एकत्र येण्याबाबत हालचाली सुरू आहेत. व्होडाफोन टेलिकॉम कंपनी आयडिया कंपनीत विलीन होण्याबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. आदित्य विक्रम बिर्ला ग्रुपमध्ये विलीन होण्याच्या वृत्ताला व्होडाफोन इंडियाने दुजोरा दिला आहे. जर व्होडाफोन आयडियामध्ये विलीन झाल्यास आयडिया भारतातील क्रमांक एकची टेलिकॉम कंपनी होणार आहे.

व्होडाफोनच्या इंदूज् टॉवर्समधील 42 शेअर्स सोडून बाकी सर्व शेअर्स व्होडाफोनने आडियात विलीन केले आहेत, असे व्होडाफोन कंपनीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Vodafone's idea to compete for Xiao