व्होडाफोनची जबरदस्त ऑफर, अवघ्या 19 रुपयांत अनलिमिटेड फ्री कॉलिंग
By Admin | Updated: May 25, 2017 17:33 IST2017-05-25T17:20:48+5:302017-05-25T17:33:10+5:30
व्होडाफोननं जबरदस्त ऑफर ग्राहकांसाठी बाजारात आणल्या आहेत.

व्होडाफोनची जबरदस्त ऑफर, अवघ्या 19 रुपयांत अनलिमिटेड फ्री कॉलिंग
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - व्होडाफोननं जबरदस्त ऑफर ग्राहकांसाठी बाजारात आणल्या आहेत. जिओचा धसका घेत व्होडाफोननंही अवघ्या 19 रुपयांत अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा एक प्लॅन आणला आहे. या प्लॅनअंतर्गत दरदिवशी 4G स्पीडचा 100 एमबी डेटा मिळणार आहे. सुपर डे या नावाच्या या प्लॅनवर ग्राहकांच्या नक्कीच उड्या पडणार आहेत. व्होडाफोननं सुपर डेनंतर आणखीही दोन प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत.

पहिला 19 रुपयांचा प्लॅन हा एका दिवसापुरता मर्यादित आहे. तर दुसरा आणि तिसरा प्लॉन अनुक्रमे 49 आणि 89 रुपयांचा आहे. या ऑफरचं नाव सुपर वीक असून, याची वैधता आठवड्याभराची आहे. एक दिवसाच्या 19 रुपयांच्या रिचार्जवर व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड आहे. यासोबत 100 जीबी 4G डेटाही फ्री मिळणार आहे. ही ऑफर 4जी हँडसेट वापरकर्त्यांसाठी आहे. 49 रुपयांच्या पॅकची वैधता 7 दिवसांची आहे. यात तुम्हाला 7 दिवसांपर्यंत व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड मोफत मिळणार आहे. तसेच याबरोबरच दिवसाला तुम्हाला 250 एमबी 4जी डेटा फ्री मिळणार आहे. तर 89 रुपयांच्या ऑफरची वैधताही 7 दिवसांचीच आहे.
(जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोनची हातमिळवणी)
या ऑफर अंतर्गत व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड मोफत उपलब्ध आहे. यात 100 मिनिटांचा टॉकटाइमही देण्यात आला आहे. मात्र तो फक्त दुस-या नेटवर्कसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच या ऑफरअंतर्गत 250 एमबी 4जी डेटा फ्री मिळणार आहे. या सर्व ऑफर तुम्ही व्होडाफोनची वेबसाइट आणि माय व्होडाफोन अॅप आणि रिटेल स्टोअरमधूनही मिळवू शकता. मात्र या सर्व ऑफर फक्त प्रीपेड यूझर्ससाठीच उपलब्ध आहेत. त्यामुळे पोस्टपेड प्लॅनसाठी व्होडाफोन काय ऑफर घेऊन येणार आहे, याची उत्कंठा लागून राहिली आहे.