‘वन रँक, वन पेन्शन’ आंदोलनात व्ही.के. सिंग यांची कन्या

By Admin | Updated: August 23, 2015 23:19 IST2015-08-23T23:19:41+5:302015-08-23T23:19:41+5:30

‘वन रँक, वन पेन्शन’च्या मागणीसाठी माजी सैनिकांनी दिल्लीत आरंभलेल्या आंदोलनात रविवारी अनपेक्षितपणे मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री

VK in the 'One Rank, One Pension' movement Singh's daughter | ‘वन रँक, वन पेन्शन’ आंदोलनात व्ही.के. सिंग यांची कन्या

‘वन रँक, वन पेन्शन’ आंदोलनात व्ही.के. सिंग यांची कन्या

नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’च्या मागणीसाठी माजी सैनिकांनी दिल्लीत आरंभलेल्या आंदोलनात रविवारी अनपेक्षितपणे मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांची कन्या मृणालिनी हिने उडी घेतली. विशेष म्हणजे, मृणालिनीने आपल्या पित्यालाही या आंदोलनात सहभागी होण्याचा सल्ला दिला.
रविवारी सकाळी मृणालिनी स्वत:हून जंतरमंतर येथे पोहोचली आणि ‘वन रँक, वन पेन्शन’साठीच्या आंदोलनात सहभागी झाली. मृणालिनी हिचे पती हे सुद्धा लष्करात अधिकारी आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना मृणालिनीने आंदोलनास सक्रिय पाठिंबा दर्शविला. मी एका माजी लष्करी अधिकाऱ्याची कन्या म्हणून या आंदोलनास पाठिंबा देत आहे.

Web Title: VK in the 'One Rank, One Pension' movement Singh's daughter