२० वर्षांनंतर परत मिळाली दृष्टी
By Admin | Updated: March 14, 2017 00:36 IST2017-03-14T00:36:24+5:302017-03-14T00:36:24+5:30
तुम्ही कधी ऐकलयं का? की, एखादी महिला घरात पाय घसरून पडल्या आणि त्यांना गेलेली दृष्टी परत मिळाली. ही घटना फ्लोरिडा येथे घडली आहे.

२० वर्षांनंतर परत मिळाली दृष्टी
न्यू दिल्ली : तुम्ही कधी ऐकलयं का? की, एखादी महिला घरात पाय घसरून पडल्या आणि त्यांना गेलेली दृष्टी परत मिळाली. ही घटना फ्लोरिडा येथे घडली आहे. एका ७० वर्षांच्या महिलेला २० वर्षांपासून गेलेली दृष्टी ही फक्त घरात पाय घसरून पडल्यामुळे परत मिळाली आहे.
अन फ्रांको नावाची ही महिला असून, १९९३ मध्ये एका मोटार अपघातात त्यांना दिसायचे बंद झाले होते. आॅगस्ट २०१५ ला त्या बेडरूमपासून दरवाजाकडे जात होत्या. यावेळी अचानक त्यांचा पाय घसरला व त्या खाली पडल्या.
यामुळे त्यांचा डोक्याच्या मागील बाजूस थोडा मार लागला होता. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या मानेचे एक आॅपरेशन केले होते. जेव्हा त्या मूर्च्छित अवस्थेतून बाहेर आल्या, तेव्हा त्यांना दिसायला लागले.