भाजपाचे जाहीरनाम्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30

दिल्ली विधानसभा निवडणूक

Vision document instead of BJP's manifesto | भाजपाचे जाहीरनाम्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट

भाजपाचे जाहीरनाम्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट

ल्ली विधानसभा निवडणूक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातर्फे कुठलाही जाहीरनामा जारी केला जाणार नाही. त्याऐवजी येत्या एक दोन दिवसात राजधानीचे एक व्हिजन डॉक्युमेंट सादर केले जाईल, अशी घोषणा भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी येथे करण्यात आली. या दृष्टीपत्रात दिल्लीच्या जनतेचा विकास आणि कल्याणार्थ आराखडा मांडला जाणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय झाला. यावेळी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मुद्यांवरही चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांनी याबाबत माहिती दिली. (वृत्तसंस्था)

कोट
आम्हाला दोन तृतीयांश बहुमताने ही निवडणूक जिंकायची आहे. आणि हा आमचा ऐतिहासिक विजय असेल. पुढील काही दिवसात केंद्रीय मंत्र्यांसह भाजपाचे १२० खासदार प्रचारात उतरतील.

अनंतकुमार
भाजपा नेते


Web Title: Vision document instead of BJP's manifesto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.