विशाल बरबटे शिवसेनेत
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:39+5:302014-12-18T00:40:39+5:30
फोटो- विशाल बरबटे

विशाल बरबटे शिवसेनेत
फ टो- विशाल बरबटे नागपूर : काही दिवसांपूर्वीच मनसेच्या नागपूर सहसंपर्क प्रमुख पदासह सदस्यत्वाचा राजीनामा देणारे विशाल बरबटे यांनी बुधवारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षासाठी निष्ठेने काम करू, असा शब्द या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.पक्ष प्रवेशावेळी पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख व आरोग्य मंत्री दीपक सावंत, खा. कृपाल तुमाने यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या रूपात सुशिक्षित, उद्योजक व स्वीकारार्ह तरुण शिवसेनेसाठी कामाचा ठरेल, पक्षाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत, अशा शब्दात ठाकरे यांनी बरबटे यांच्यावर विश्वास दाखविला. बरबटे यांच्यासह कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला.