सोलापूर : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून विशाखापट्टणमकडे निघालेल्या ट्रेनचा एसी बंद पडल्याने प्रवाशांनी सोलापूर स्टेशवर गाडी रोखून धरली. तो दुरुस्त झाल्यानंतर अर्ध्या तासाने गाडी पुढे मार्गस्थ झाली़ रविवारी दुपारी हा प्रकार घडला़या वातानुकूलित गाडीत ए-१ डब्यातील एसी पुण्याजवळ बंद पडला़ त्यामुळे आतमधील प्रवाशांना गुदमरल्यासारखे झाले. दुपारी ३च्या सुमारास ही गाडी सोलापूर स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर थांबताच डब्यातील प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली़
विशाखापट्टणम रेल्वे रोखली !
By admin | Updated: January 18, 2016 03:42 IST