भारत-पाकिस्तानात आता व्हिसा युद्ध

By Admin | Updated: July 18, 2015 04:32 IST2015-07-18T04:32:12+5:302015-07-18T04:32:12+5:30

जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनावरून तणावपूर्ण वातावरण असतानाच भारत आणि पाकिस्तानदरम्यान आता व्हिसा युद्ध सुरू झाले आहे.

Visa war in India and Pakistan now | भारत-पाकिस्तानात आता व्हिसा युद्ध

भारत-पाकिस्तानात आता व्हिसा युद्ध

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनावरून तणावपूर्ण वातावरण असतानाच भारत आणि पाकिस्तानदरम्यान आता व्हिसा युद्ध सुरू झाले आहे. मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना असाईन्मेंट व्हिसा देण्यात येत नसल्याचा आरोप उभय देशांनी केला आहे.
पाकिस्तानने आपल्या १२ अधिकाऱ्यांना व्हिसा दिला नाही, असे भारताचे म्हणणे आहे, तर आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना अलीकडच्या काळात अनेक असाईन्मेंट व्हिसा जारी केले पण भारताने मात्र एकही व्हिसा दिला नाही, असा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले, की नौसेना आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसह आमच्या मुत्सद्यांनाही अद्याप व्हिसा मिळाला नसल्याने ते भारतात अडकले आहेत. भारताने हा दावा फेटाळला आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Visa war in India and Pakistan now