शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Virat Ramayan Mandir: मुस्लिम कुटुंबाने 'रामायण मंदिरा'साठी दान केली कोट्यवधी रुपयांची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:44 IST

Virat Ramayan Mandir: बिहारच्या पूर्ण चंपारण जिल्ह्यात भव्य 'रामायण मंदिर' उभारले जात आहे.

पाटणा: धार्मिक सलोख्याचे उदाहरण मांडत बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाने मंदिरासाठी आपली कोट्यवधी रुपयांची जमीन दान केल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात भव्य रामायण मंदिर बांधले जाणार आहे. यासाठी एका मुस्लिम कुटुंबाने आपली अडीच कोटी रुपयांची जमीन मंदिरासाठी दिली आहे.

मुस्लिम कुटुंबाने मंदिरासाठी जमीन दान केलीबिहारच्या पूर्व चंपारणमधील कैथविसाया परिसरात 'भव्य रामायण मंदिर' बांधले जात आहे. हे बिहारमधील सर्वात मोठे देशातील मोठ्या मंदिरांपैकी एक असेल. मंदिराच्या बांधकामासाठी कैथवालिया येथील इश्तियाक अहमद खान यांनी आपली 16560 चौरस फुटांची जमीन दान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, ही जमीन पूर्व चंपारण येथील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी दान केली आहे. 

दोन समुदायांमधील सामाजिक सौहार्दाचे उदाहरणमहावीर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी आयपीएस आचार्य किशोर कुणाल म्हणाले की, इश्तियाक अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली ही देणगी सामाजिक सलोखा आणि दोन समाजातील बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे कठीण झाले असते, असे ते म्हणाले. या मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत महावीर मंदिर ट्रस्टला 125 एकर जमीन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टला लवकरच या परिसरात आणखी 25 एकर जागा मिळणार आहे.

असे असेल मंदिरहे भव्य रामायण मंदिर कंबोडियामधील जगप्रसिद्ध अंकोरवाटच्या धर्तीवर बांधले जात आहे. पूर्व चंपारणमधील चकिया-केसरियाजवळ जानकीपूर येथे हे 'विराट रामायण मंदिर' बांधले जाईल. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची उंची 270 फूट, लांबी 1080 फूट आणि रुंदी 540 फूट असेल.  

मंदिराचे वैशिष्ट्य

हे मंदिर 'टेम्पल ऑफ टॉवर्स' म्हणून ओळखले जाईल. त्याच्या आजूबाजूला 13 मंदिरे बांधली जात आहेत आणि ती सर्व उंच शिखरे असलेली मंदिरे आहेत. शेजारील चार मंदिरे 180 फूट उंच आहेत. यासोबतच मंदिरात 33 फूट उंचीच्या भव्य शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंदिरासाठी एकूण 500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मंदिर ट्रस्ट लवकरच नवी दिल्लीतील संसद भवनाचे निर्माण करणाऱ्या जानकारांचा सल्ला घेईल.

मार्चपासून मंदिर उभारणीला सुरुवात 

मार्चअखेर मंदिर उभारणीचे काम सुरू होईल. येत्या अडीच वर्षांत ही रचना उभारण्यात येणार असून त्यानंतर पुढील अडीच वर्ष त्याच्या फिनिशिंगसाठी लागणार आहेत. फिनिशिंगसाठी दक्षिण भारतातील कलाकारांना बोलावण्यात येणार आहे. महावीर मंदिर ट्रस्टकडे मंदिर बांधण्यासाठी इतका पैसा आहे की पायापासून शिखरापर्यंतची रचना तयार होईल. त्यानंतर गरज भासल्यास ट्रस्ट बिहारमधील जनतेची मदत घेईल. 

टॅग्स :TempleमंदिरBiharबिहार