विराट कोहलीच्या पाकिस्तानी चाहत्याला जामीन मंजूर
By Admin | Updated: February 27, 2016 16:42 IST2016-02-27T16:42:41+5:302016-02-27T16:42:41+5:30
पाकिस्तानातील विराट कोहलीचा चाहता उमर दराजची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. उमर दराजने आपल्या घरावर भारताचा तिरंगा फडकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती

विराट कोहलीच्या पाकिस्तानी चाहत्याला जामीन मंजूर
>ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. 27 - पाकिस्तानातील विराट कोहलीचा चाहता उमर दराजची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. उमर दराजने आपल्या घरावर भारताचा तिरंगा फडकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ओकारामधील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीनावर त्याची सुटका केली आहे.
डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे 25 जानेवारीला आपल्या घरावर भारताचा झेंडा फडकावल्याप्रकऱणी पोलिसांनी अटक केली होती. 18 फेब्रुवारीला त्याची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात नव्याने जामीन अर्ज देण्यात आला होता. न्यायालयाने शुक्रवारी जामीन अर्ज मान्य केला होता. न्यायालयाने 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याची सुटका केली आहे.