शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनंदन अमेरिकेत पकडला गेला, क्षेपणास्त्र डागायला गेला होता; भाजप खासदाराचं अगाध ज्ञान ऐकाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 19:13 IST

भाजप खासदार छतर सिंह दरबार यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणगान गाताना भारतीय जनता पक्षाच्या खासदारानं इतिहास-भूगोल बदलून टाकला आहे. या खासदार महोदयांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचं अगाध ज्ञान ऐकून अनेकांना हसू आवरता येत नाहीए. छतर सिंह दरबार असं या खासदारांचं नाव असून ते लोकसभेत मध्य प्रदेशातल्या धार मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.

उज्ज्वला योजना २.० च्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात दरबार यांना अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आलं होतं. उज्ज्वला योजनेचे फायदे सांगताना दरबार अमेरिकेपर्यंत पोहोचले. यावेळी यूपीए सरकारला लक्ष्य करण्याच्या हेतूनं त्यांनी अजब दावे केले. 'अमेरिकन सैनिक आणि दहशतवादी भारतीय जवानांची मुंडकी कापून घेऊन गेले. ते या मुंडक्यांनी फुटबॉल खेळले. भारताला खिजवण्यासाठी त्यांनी याचा व्हिडीओ तयार केला,' असं दरबार म्हणाले. धार यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आता भारत याचना करत नाहीपंतप्रधान मोदींचं कौतुक करताना दरबार यांनी यूपीए सरकारवर टीका केली. 'अमेरिकेचे सैनिक आणि दहशतवादी भारतीय जवानांचं शिर घेऊन गेले. तेव्हा यूपीए सरकार मोठ्या देशांकडे याचना करत होतं. आम्हाला आमच्या सैनिकांची शिर परत द्या यासाठी यूपीए सरकार मदत मागत होतं. मात्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भारत याचना करत नाही,' असं दरबार म्हणाले.

...म्हणे अभिनंदन अमेरिकेत पकडला गेलादरबार यांनी त्यांच्या भाषणात हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचाही उल्लेख केला. 'तुमच्या लक्षात असेल तो आपला सैनिक कोण होता..? तो वायुसेना अधिकारी पकडला गेला होता अमेरिकेत. अभिनंदन! अभिनंदन तिथे पुष्पवृष्टी करायला गेला नव्हता. अभिनंदन तिथे क्षेपणास्त्र डागायला गेला होता. तोफगोळे फोडायला गेला होता. तिथे काही कारणांमुळे तो पकडला गेला. त्यावेळी मी सभागृहात उपस्थित होतो. मी मोदींचं कौशल्य त्यावेळी पाहिलं. माझ्या अभिनंदनला सोडवा असं म्हणत त्यावेळी मोदींनी कोणासमोर हात पसरले नाहीत,' असं दरबार म्हणाले. छतरसिंह दरबार यांचं अगाध ज्ञान उपस्थितांना हसू अनावर झालं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान