जोडप्याला पॅरासिलींग पडली महागात, पॅराशूट हवेत उडताच तुटली दोरी; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 07:37 PM2021-11-16T19:37:21+5:302021-11-16T19:44:44+5:30

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही अशाप्रकारच्या साहसी गोष्टी करण्यापूर्वी दहावेळा विचार कराल.

Viral video of couple falls into sea after rope cuts while parasailing in Gujarat | जोडप्याला पॅरासिलींग पडली महागात, पॅराशूट हवेत उडताच तुटली दोरी; पाहा VIDEO

जोडप्याला पॅरासिलींग पडली महागात, पॅराशूट हवेत उडताच तुटली दोरी; पाहा VIDEO

Next

नवी दिल्ली: तुम्ही अनेकदा प्रत्यक्षात किंवा सोशल मीडियावर अॅडव्हेंचरस म्हणजेच साहसी गोष्टींचे व्हिडिओ पाहिले असतील. पॅराग्लायडींग, पॅरासिलींग, रोप जंपींग, स्काय डायव्हिंग यासारखे अनेक साहसी खेळ खेळले जातात. अनेकांना या साहसी खेळातून आनंद मिळतो, पण काहीवेळा हेच खेळ जीवावरही बेतू शकतात. अशाच साहसी खेळादरम्यान अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही ह्रदयाची धडधड सुरू होईल आणि अशाप्रकारचे साहसी खेळ खेळण्यापूर्वी तुम्ही दहावेळा विचार कराल. व्हायरल होणारा व्हिडिओ पॅरासिलींगचा आहे. व्हिडिओत एक जोडपे बोटीला दोरी बांधून पॅरासिलींग करताना दिसत आहेत. यादरम्यान पॅराशुटच्या मदतीने हे जोडपे हवेत खूप उंच जाते, पण तेवढ्यात पॅराशुटची दोरी तुटते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दीवच्या नागवा बीचचा आहे, जिथे गुजरातच्या जुनागडमधील एक जोडपे रविवारी सकाळी पॅरासिलींग करण्यासाठी पोहोचले होते. इथे बोटीच्या सहाय्याने ते पॅरासिलींग करण्याचा निर्णय घेतात. पण यादरम्यान त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग ते कधीच विसरू शकणार नाहीत. अजित काथड आणि सरला काथड असे या पॅरासिलींग करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे. रविवारी सकाळी पॅरासेलिंगसाठी दीवच्या नागोवा बीचवर गेले असता, त्यांच्यासोबत हा अपघात घडला. अजित यांच्या मोठ्या भावाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सुदैवाने पाण्यातच पडल्यामुळे कोणतीची जीवितहानी झाली नाही.
 

Web Title: Viral video of couple falls into sea after rope cuts while parasailing in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.