शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIRAL: अटलबिहारींचं जाणं अन् मोदींचं हसणं; 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 12:49 IST

माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी हे स्पष्टवक्ते होते, कवी होते, अनेकदा मृदू असत, आपल्या भूमिकांबाबत ठाम असत आणि विरोधकांसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.अटलजींच्या जाण्यानं पूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. अटलबिहारी वाजपेयी एम्समध्ये व्हेंटिलेटरवर असताना नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती. 16 ऑगस्टला वाजपेयींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये मोदी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांबरोबर बोलताना त्यांच्या चेह-यावर हास्य फुललेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीनं या फोटोच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वृत्तवाहिनीच्या पाहणीत हा फोटो मोदींचाच असल्याचं समोर आलं.मोदींचे कपडे आणि बॉडीगार्ड यांचे चेहरे मिळते-जुळते असल्याचंही या फोटोतून स्पष्ट होतेय. परंतु याचा अर्थ वाजपेयींच्या मृत्यूनंतर मोदी हसत असल्याचा दावा करणं चुकीचे ठरेल. कारण मोदी 16 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी वाजपेयींना भेटून बाहेर आले. तर वाजपेयींचं निधन 16 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी झाले. त्यामुळे वाजपेयींच्या निधनानंतर मोदी एम्समधील डॉक्टरांबरोबर हसत असल्याचा दावा करणं चुकीचं आहे, कारण मोदी अटलजींच्या निधनानंतर एम्स रुग्णालयात उपस्थितच नव्हते, असं एका वृत्तवाहिनीच्या पाहणीत आढळलं आहे.तर दुस-या एका फोटोमध्ये एका पार्थिव शरीराला डॉक्टर मान झुकवून श्रद्धांजली देत असल्याचं पाहायला मिळतंय. तो फोटो अटलजींचा असल्याचीही चर्चा आहे. परंतु तो फोटो अटलजींचा नसून 2012 रोजी चीनमध्ये मृत्यू झालेल्या वू हुआजिंग हिचा आहे. तिने मृत्यूनंतर स्वतःचे अवयव रुग्णालयाला दान केले होते. म्हणून डॉक्टर तिला श्रद्धांजली देत होते. तर जमिनीवर अटलजींच्या ठेवलेल्या पार्थिवाचा फोटोही समोर आला होता. परंतु अटलबिहारी वाजपेयींचा मृतदेह जमिनीवर ठेवण्यातच आला नव्हता. त्यांचं पार्थिव तिरंग्यात सन्मानानं लपेटून ठेवण्यात आलं होतं. तसेच मोदींनी अर्ध्या हाताचा कुर्ताही परिधान केला नव्हता, अटलजींना श्रद्धांजली वाहताना मोदींनी पूर्ण हाताचा कुर्ता घातला होता. त्यामुळे सोशल मीडियावर मोदींसंदर्भात व्हायरल होणारे फोटो किती खरे आणि किती खोटे आहेत, हाच एक संशोधनाचा विषय आहे. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNarendra Modiनरेंद्र मोदी