दिग्गजांची बेताल वक्तव्ये

By Admin | Updated: April 2, 2015 05:35 IST2015-04-01T23:47:23+5:302015-04-02T05:35:05+5:30

सोनिया गांधी गोऱ्या असल्यामुळे काँग्रेसजनांनी त्यांना अध्यक्ष केले. राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते तर तिला अध्यक्ष केले नसते

Violent statements of veterans | दिग्गजांची बेताल वक्तव्ये

दिग्गजांची बेताल वक्तव्ये

नवी दिल्ली : सोनिया गांधी गोऱ्या असल्यामुळे काँग्रेसजनांनी त्यांना अध्यक्ष केले. राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते तर तिला अध्यक्ष केले नसते, असे वक्तव्य भाजपचे खा. गिरीराज सिंह यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा वाद निर्माण होऊन समाजमन ढवळून निघाले आहे. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपचेच नेते बेताल वक्तव्य करून सरकारची नाचक्की करीत आहेत. मात्र भाजपच नाही तर इतर पक्षांच्या अनेकांनी उचलली जीभ लावली टाळ्याला, असे अनेकदा केलेले आहे. त्याचीच ही झलक.

> समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी महिलांवर त्या परपुरुषासोबत फिरल्यामुळे बलात्कार होतात, असे वक्तव्य केले होते.

>सर्व पदांवर सुंदर महिलांना निवडावे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला राष्ट्रपती करावे, अशी सूचना केली होती.

>बलात्कारासारख्या चुका तरुणपणी मुलांकडून होतात, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी म्हटले होते.> महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे भाजपचे खासदार साक्षी महाराज म्हणाले होते.

> मतदानाच्या आधीचे दहा दिवस लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. याच काळात हरामाचा पैसा गरिबाच्या पदरात पडतो म्हणून या लक्ष्मीला नाकारू नका, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते.

> उन्हात बसू नका. काळ्या व्हाल. तसे झाले तर तुमचे लग्न होणार नाही, असा सल्ला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिला होता.

Web Title: Violent statements of veterans