शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच; दोन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 21:55 IST

आरोपांचे तृणमूल काँग्रेसने खंडन केले असून पोलिसांनुसार नजीमुलचा मृत्यू दारुड्यांनी केलेल्या मारहाणीत झाला आहे.

कोलकाता : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरूच असून कार्यकर्त्यांच्याही हत्या केल्या जात आहेत. उत्तर परगना जिल्ह्यातील आमडांगामध्ये दोघांची हत्या करण्यात आली आहे. 

मृतांचे नाव नजीमुल करीम उर्फ अकबर अली मंडल (23) आणि गोपाल पाल (50) असे आहे. नजीमुल आमडांगामधील बईचगाछीचा राहणारा आहे. तर गोपाळ हे बेडुग्रामचे रहिवासी आहेत. भाजपाने हे दोघेही पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप केला आहे. 

या आरोपांचे तृणमूल काँग्रेसने खंडन केले असून पोलिसांनुसार नजीमुलचा मृत्यू दारुड्यांनी केलेल्या मारहाणीत झाला आहे. तर गोपाळची हत्या व्यवहारातील वैमनस्यातून झाली आहे. नजीमुल शुक्रवारी रात्री डॉक्टरकडे गेला होता. घरी परतत असताना कथितरित्या दोन दारुड्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये नजीमुलला मारहाण करण्यात आली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच रस्ता रोखला होता. तसेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. नजीमुल हा आधी माकपाचा कार्यकर्ता होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांने भाजपात प्रवेश केला होता. 

दुसऱ्या घटनेमध्ये गोपाळ यांचा मृतदेह एका दुकानात आढळून आला. त्याची हत्या तृणमूलच्या गुंडांनी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तसेच त्यांच्या मुलानेही भाजपाच्या नेत्यांच्या जवळचे असल्याने वडीलांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा