शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब-हरियाणामध्ये जमाव झाला हिंसक! रेल्वेस्टेशन, गाडयांची जाळपोळ, हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 17:51 IST

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर पंजाब, हरयाणामध्ये हिंसाचार सुरु झाला आहे.

पंचकुला, दि. 25 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर पंजाब, हरियाणा या दोन राज्यांमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. राम रहीम यांच्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅन्स फोडल्या. सुरक्षापथकांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. 

काही ठिकाणी हवेत गोळीबारही करावा लागला. पंजाबमध्ये दोन रेल्वे स्थानके जाळून टाकल्याचे वृत्त आहे. पंचकुलामध्ये जमावाने सुरक्षापथकांवरच हल्ला केला. यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना मागे हटावे लागले. गोळीबारात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेक गाडयांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

घटनाक्रम -

- आतापर्यंत झालेल्या हिंसाचारामध्ये 12 जण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. 

- हिंसाचारमध्ये 10 जण जखमी झाले असून, त्यांना पंचकुलाच्या सेक्टर 6 मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

- पंजाबमधील मालौत रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप जाळले, भतिंडामध्येही अशीच परिस्थिती आहे. 

- पंचकुलामध्ये आजतक, टाइम्सनाऊची ओबी व्हॅन्स जाळल्या. 

- पंचकुलामध्ये एका पत्रकारांची दुचाकी जाळली. 

- पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी डेरा समर्थकांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

- पंचकुलाच्या सेक्टर 5 मध्ये हिंसक झालेल्या जमावाला आवर घालण्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या. 

- पंजाब, हरयाणामधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्तकेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली - आनंद विहार रेल्वे टर्मिनसमध्ये उभी असलेल्या रेवा एक्स्प्रेसच्या दोन रिकाम्या डब्यांना आग

- बाबा राम रहीम प्रकरण - पंचकुला हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू , सरकारी रुग्णालयातील डॉकराची माहिती. 

-पंजाब : मुक्तसर, भटिंडा आणि मानसा येथे संचार बंदी लागू

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाच्या 53 तुकडया आणि हरयाणा पोलिस दलाचे 50 हजार जवान तैनात करण्यात आले होते तसेच पंजाब, हरयाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये 72 तासांठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. 

टॅग्स :Crimeगुन्हा