व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या

By Admin | Updated: July 6, 2015 13:12 IST2015-07-06T11:19:27+5:302015-07-06T13:12:57+5:30

मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच असून आज या प्रकरणात नाव आलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली आहे.

Violence scandal commences, female police suicide | व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या

व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ६ - मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच असून आज या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. 
व्यापमंच्या माध्यमातून पोलीस दलात भरती झालेल्या अनामिका कुशवाह यांनी सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घोटाळ्याशी संबंधित तीन लोकांचा गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली असून या मृत्यू सत्रामागे नेमकं काय दडलं आहे, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 
शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा तर काल म्हणजेच रविवारी जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील हॉटेलमध्ये सापडला होता. त्या पाठोपाठ आज ( सोमवार)  प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या मृत्यूमुळे व्यापमं गैरव्यवहार प्रकरणात मृतांची संख्या आता २८वर पोचली आहे. 
 
दरम्यान याप्रकरणावरून काँग्रसने भाजपावर हल्लाबोल करत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरत असून याप्रकरणी शिवराज सिंग यांची चौकशी का होत नाही असा सवालही काँग्रेसतर्फे विचारण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. 

 

Web Title: Violence scandal commences, female police suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.