जेएनयूतील हिंसाचार : पोलिसांनी सुरू केली चौकशी, पुरावे घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:16 AM2020-01-08T05:16:57+5:302020-01-08T05:17:17+5:30

हिंसाचाराची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून चेहरे झाकून आलेल्या गुंडांना शोधण्यासाठी गुन्हा शाखा व स्थानिक पोलिसांच्या तुकड्या सक्रिय झाल्या आहेत.

Violence in JNU: Police launched inquiry, taking evidence | जेएनयूतील हिंसाचार : पोलिसांनी सुरू केली चौकशी, पुरावे घेतले

जेएनयूतील हिंसाचार : पोलिसांनी सुरू केली चौकशी, पुरावे घेतले

Next

एस. के. गुप्ता 
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) झालेल्या हिंसाचाराची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून चेहरे झाकून आलेल्या गुंडांना शोधण्यासाठी गुन्हा शाखा व स्थानिक पोलिसांच्या तुकड्या सक्रिय झाल्या आहेत. मात्र दोन दिवसांनंतरही कोणालाही अटक झालेली नाही.
दिल्ली पोलिसांनी ही चौकशी संयुक्त पोलीस आयुक्त शालिनी सिंह यांच्याकडे दिल्यावर त्या मंगळवारी आपल्या टीमसोबत विद्यापीठात गेल्या. त्या हिंसाचार झालेल्या सगळ््या जागी जाऊन विद्यार्थ्यांशी बोलल्या. त्यांनी सिंह यांना महत्वाची माहिती दिली. फॉरेन्सिक टीमनेही हिंसाचार झालेल्या जागांवरील पुरावे गोळा केले. त्यामुळे हल्लेखोरांना पकडण्यास मदत मिळेल. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, समाज माध्यमांवर पसरवले जात होते त्या व्हॉट्सअ‍ॅपच्या स्क्रीनशॉट्सची चौकशी मोबाईल नंबरसह केली जात आहे. त्यातील बरेच नंबर्स स्वीचड्आॅफ आहेत.
परंतु, त्या नंबर्सचे ठिकाण (लोकेशन्स) हिंसाचाराच्या वेळी कोणते होते याची चौकशी केली जात आहे. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी पोलीस व्हिडियो फुटेज, चेहरे ओळखणाºया प्रणालीचा उपयोग करीत आहेत. १०० पेक्षा जास्त कॅमेऱ्यांतील व्हिडियोज ताब्यात घेण्यात आले आहेत. शालिनी सिंह पोलीस वर्तुळात मॅडम ट्रेस आॅफ ब्लार्इंड केस या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक खूनाचे गूढ उकलले आहे. सेठ यांची हत्या घरातील नोकराने करून तो फरार झाला होता.
हत्येच्या वेळी खोलीत उलट्या पडलेल्या चप्पलवरून शालिनी सिंह यांनी हत्येचे गूढ उकलले होते. म्हणून जेएनयुतील चेहरे झाकून आलेल्या हल्लेखोरांना शोधण्याचे काम दिल्ली पोलिसांतील तरूण व उत्साही आयपीएस अधिकारी शालिनी सिंह यांना दिले गेले. त्यांचे पती अनिल शुक्ला हे देखील आयपीएस अधिकारी असून ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे मुख्य सतर्कता अधिकारी आहेत.

Web Title: Violence in JNU: Police launched inquiry, taking evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.