शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:03 IST

हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी संघ शताब्दी निमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात व्यक्त केले.

नागपूर : काही लोक जाणूनबुजून एकतेवर प्रहार करण्याचे प्रयत्न करतात. श्रद्धास्थाने, महापुरुष व प्रार्थनास्थळांसंबंधात अनादराच्या घटना घडतात. लहानसहान बाबींवरून हिंसाचार होतो. एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी हे घडवले जाते. हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी संघ शताब्दी निमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात व्यक्त केले.

नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित संघाच्या शताब्दी वर्षातील शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

‘संघात जातीभेद किंवा अस्पृश्यता नाही’संघाचे स्वयंसेवक भारतीय परंपरेतील एकता आणि सातत्य यांना महत्त्व देतात. संघामध्ये अस्पृश्यता किंवा जातीभेद नाही. तथापि, समाजात याबद्दल अनेक गैरसमज आहेत, जे दूर करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघाच्या सामाजिक सौहार्दाच्या भावनेने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी सांगितले.  

महात्मा गांधींबाबत संघमंचावर गौरवोद्गारसरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. महात्मा गांधी आपल्या स्वातंत्र्याच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत. स्वातंत्र्योत्तर ‘स्व’ आधारित भारताची संकल्पना दृढ करणाऱ्या तत्वज्ञानींमध्ये महात्मा गांधी यांचे आदराचे स्थान आहे, असे मत  सरसंघचालकांनी व्यक्त केले. 

शांतता, स्थैर्य आणि प्रगती भारताच्या समृद्धीसाठी आवश्यकआपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे. अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात, तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. परंतु, हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. शेजारी देशांमध्ये आपल्या स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यापेक्षा शांतता, स्थिरता, प्रगती भारताच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Violence is not the answer; democracy brings change: Mohan Bhagwat

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat stressed unity, social harmony, and democracy at the Vijayadashami event. He highlighted Mahatma Gandhi's importance and the need for regional peace, while former President Kovind praised the RSS's inclusivity.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर