शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 10:13 IST

Manipur Violence: मागच्या दीड वर्षांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिरिबाम जिल्ह्यातील एका नदीमध्ये सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच राज्यात हिंसाचार उफाळला आहे.

मागच्या दीड वर्षांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिरिबाम जिल्ह्यातील एका नदीमध्ये सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच राज्यात हिंसाचार उफाळला आहे. आंदोलकांनी तीन मंत्र्यांसह सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यानंतर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यातील परिस्थिती खूपच बिघडली असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

संतप्त आंदोलकांनी आमदारांच्या घरांवर हल्ला केला आहे. त्यात मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या जावयाच्या घराचाही समावेश आहे. हिंसक जमावाने आमदारांच्या घरांची जाळपोळ केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करावा लागला.  

सोमवारीपासून बेपत्ता असलेल्या दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह शनिवारी जिरिबाममधील बारक नदीमध्ये सापडला. तर अन्य तिघांचे मृतदेह हे शुक्रवारी रात्री सापडले होते. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी  आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले होते. ज्या मंत्र्यांच्या घरांना आंदोलकांनी लक्ष्य केले, त्यामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री सापम रंजन,  सार्वजनिक वितरणमंत्री एल. सुसींद्रो सिंह आणि शहरी विकासमंत्री वाय. खेमचंद यांच्या घरांचा समावेश आहे. उफाळलेला हिंसाचार विचारात घेऊन राज्य सरकारने इंफाळ पूर्व आणि पश्चिम, बिष्णुपूर, थौबल आणि कचिंग जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndiaभारत