शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

दिल्ली, अलिगढमध्ये ‘सीएए’वरून हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 03:54 IST

दोन्ही ठिकाणी पोलिसांचा लाठीमार व अश्रुधूर, दोन मेट्रो स्टेशन बंद

नवी दिल्ली/अलिगढ : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात सुरु असलेल्या आंदोलनास राजधानी दिल्लीत व उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे रविवारी हिंसक वळण लागले. दोन्ही ठिकाणी हाणामारी, जाळपोळ व दगडफेक झाल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तणाव कायम असल्याने अलिगढमधील इंटरनेट सेवाही सायंकाळी बंद करण्यात आली. शाहीनबाग येथील आंदोलकांना तेथून अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दिल्लीत जाफराबाद येथे आंदोलनाचे दुसरे केंद्र सुरू झाल्याचे दिसत आहे.उत्तर पश्चिम दिल्लीतील मौजपूर येथे रविवारी दोन गटात दगडफेक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. विरोध करणारे आणि समर्थन करणारे हे दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर हा प्रकार घडला.अलिगढमध्ये कोतवाली पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या मोहम्मद अली रोडवर सुमारे ५०० महिलांनी शनिवारपासून सीएएच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.आधीच इदगाह येथे आंदोलन सुरू असल्याने हे दुसरे आंदोलन करून रस्ता अडवू नका, असे सांगून समजूत घालण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली व जमावाने काही वाहनांना आग लावली. भीम आर्मीचा मोर्चा अडविल्यानंतर लगेचच आंदोलनस्थळी पोलिसांवर हा हल्ला झाला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीमार व नंतर अश्रुधुराचाही वापर केला.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक